शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलिसांना खात्यात नो-एन्ट्री

By admin | Updated: January 14, 2015 23:15 IST

गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी आणि १५ कर्मचारी लाच घेताना व लाचेच्या मागणीत अडकले. त्यानंतर त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी तडकाफडकी निलंबन केले.

सतीश येटरे - यवतमाळ गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी आणि १५ कर्मचारी लाच घेताना व लाचेच्या मागणीत अडकले. त्यानंतर त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी तडकाफडकी निलंबन केले. अनेकांना ७५ टक्के विनाकामाचे वेतनही मिळत आहे. तरीही त्यांनी पुनर्नियुक्तीसाठी (रिस्टेट) खटाटोप चालविला आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मध्यस्थांच्या भेटीसुद्धा घेतल्या जात असल्याची माहिती आहे.वर्षभरात येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध शासकीय कार्यालयातील एकूण ४३ लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाळ्यात अडकविले. त्यामुळे एसीबीची कमालीची दहशत जिल्हा प्रशासनात निर्माण झाली आहे. ४३ लाचखोरांपैकी तीन अधिकारी आणि १५ कर्मचारी असे १८ जण पोलीस खात्यातील आहे. त्यामध्ये पोलीस निरीक्षक देविसिंग बावीस्कर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, फौजदार नितीन शेलोकार, सहाय्यक फौजदार कृपाशंकर मिश्रा, बाळू मेंढे, दुर्गाप्रसाद शुक्ला, सैयद जहिरोद्दीन सैयद बहाउद्दीन ऊर्फ बाबर, दिलीप कांबळे, जमादार रमेश धोटे, हवालदार अभिजित सांगळे, पांडुरंग कौरासे, शिपाई संदीप तिजारे, धोंगडे, रवी कपिले, अनिस पटेल, सुरेश राठोड, रमेश उघडे, प्रकाश साकम आदींचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी प्रघाताप्रमाणे त्यांना तडकाफडकी निलंबित केले. काहींना निलंबित होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. त्यामुळे त्यांना नियमानुसार मुख्यालयी हजर ठेवून ७५ टक्के वेतन देण्यात येत आहे. असे असताना आणि विनाकामाचे वेतन मिळत असताना त्यांनी निलंबन मागे घेऊन जिल्हा पोलीस दलात पुनर्नियुक्ती मिळावी, यासाठी खटाटोप चालविला आहे. खात्यातीलच जुनेजाणते कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. वरिष्ठांकडेही वशिला लावण्यात येत आहे. तडजोडीसाठीही त्यांनी प्रयत्न चालविले आहे.