शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांत नऊ वेळा नैसर्गिक आपत्ती

By admin | Updated: August 10, 2014 23:12 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गत १४ वर्षात नऊ वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. कधी अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली तर कधी पावसाअभावी पीक हातचे गेले. २५ वर्षातील पावसाचा निच्चांक

पावसाचा नीचांक : यंदा कोरड्या दुष्काळाची छाया रूपेश उत्तरवार - यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गत १४ वर्षात नऊ वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. कधी अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली तर कधी पावसाअभावी पीक हातचे गेले. २५ वर्षातील पावसाचा निच्चांक यंदा नोंदविला गेला. आतापर्यंत केवळ ३३ टक्केच पाऊस झाला आहे. अत्यल्प पावसाने सव्वालाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट आले असून तीन लाख मेट्रिक टन चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्पातील पाणी साठ्यातही वाढ झाली नाही. संपूर्ण जिल्हाच कोरड्या दुष्काळाच्या सावटात आहे. शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध यवतमाळ जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा कायमच आहे. गेल्या १४ वर्षांपासून पाच वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी नैसर्गिक संकट शेतकऱ्यांपुढे आवासून उभे असते. २००२ ते २०१४ या कालावधीत नऊ वेळा निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांना अनुभवावा लागला. २००२, २००४, २००६, २००७, २००८, २०१०, २०१२, २०१३ आणि आता २०१४ मध्येही संकटाची मालिका कायम आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया आहे. केंद्र सरकारने ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा दुष्काळाच्या यादीत दिसत असून १५ आॅगस्टनंतर हा अहवाल जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या सुपूर्द करणार आहे. सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली. आतापर्यंत नऊ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. त्यामध्ये दोन लाख ३५ हजार हेक्टर सोयाबीन, चार लाख ६० हजार हेक्टर कपाशी, एक लाख हेक्टर तूर व इतर पिकांचा पेरा झाला आहे. उशिरा आलेल्या पावसाने दोन लाख हेक्टरवरचे बियाणेच उगवले नाही. मात्र सव्वालाख हेक्टरवर पुन्हा पेरणी करावीच लागली. दुबार पेरणीच्या तक्रारी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकरी देत आहे. १५ आॅगस्टपर्यंत या तक्रारी गोळा केल्या जातील. त्यानंतर दुष्काळी अहवाल सादर केला जाईल.