शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहापैकी नऊ जणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:57 IST

Yawatmal News अद्ययावत तंत्रज्ञानाने माणूस हायटेक तर झाला. परंतु तो परावलंबी झाला. त्याचा मोबाईल बंद पडला तर त्याचे सर्व काम थांबून जाते. यासाठी प्रत्येकाने दररोज रिकाॅल मेमरीचा वापर केला पाहिजे. अन्यथा मेमरी असतानाही त्याचा उपयोग होणार नाही.

ठळक मुद्दे एका कार्यक्रमात माझा मोबाइल बंद पडला. घरी फोन लावायचा होता, पत्नीचा नंबरच आठवेना. मला माझ्या बाॅसचा नंबर पाठ आहे. मात्र, बायकोचा नंबर लक्षात नाही. स्मार्ट फोनमुळे नंबर पाठ करण्याची गरजच राहिली नाही. यामुळे नंबर आठवत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : काळ बदलला. काळासाेबत विविध उपकरणेही बदलली. याचा परिणाम माणसांच्या स्मरणशक्तीवर झाला. याचा रिऍलिटी चेक ‘लोकमत’ने केला. त्यासाठी काही चाैक आणि काही व्यक्तींशी संपर्क साधला, तर अनेकांना आपल्या पत्नीचा नंबर पाठ नव्हता, तर काही पत्नींना आपल्या पतीदेवाचा नंबरही पाठ नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलांना आपल्या आई-वडिलांचा नंबर पाठ आहे.

मानसोपचार तज्ज्ञांनी या विषयात आपले मत मांडताना नागरिक आपल्या रिकाॅल मेमरीचा वापर करीत नाहीत. यामुळे असा प्रकार घडतो, असे ते म्हणाले. अद्ययावत तंत्रज्ञानाने माणूस हायटेक तर झाला. परंतु तो परावलंबी झाला. त्याचा मोबाईल बंद पडला तर त्याचे सर्व काम थांबून जाते. यासाठी प्रत्येकाने दररोज रिकाॅल मेमरीचा वापर केला पाहिजे. अन्यथा मेमरी असतानाही त्याचा उपयोग होणार नाही.

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच

- मोबाईल आल्यापासून तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण नंबरच्या बाबतीत परावलंबी झाले आहेत.

- पूर्वी मोबाईल नव्हता त्यावेळेस प्रत्येकांना कुटुंबातील सदस्यांसह काही व्यक्तींचे नंबर तोंडपाठ असायचे.

- आता नाव आठवल्यानंतर मोबाईलच्या मेमरी बाॅक्समध्ये जाऊन नंबर काढले जातात. यातून रिकाॅल मेमरी कमी होत आहे. यामुळे अनेकांना पाठ राहणारे नंबर मोबाईल पाहिल्याशिवाय सापडत नाही.

पोरांना मात्र आई-बाबांचा नंबर पाठ

प्रत्येक पालकाने आपला मुलगा कुठे विसरला तर त्याला घरी परत येता यावे, म्हणून कुटुंबीयांनी त्याच्याकडून नंबर पाठ करून घेतला. यामुळे त्याला आई-बाबांचा नंबर मूकपाठ आहे. त्यामुळे तो मोबाईल न घेता नंबर सांगू शकतो.

- आदर्श

मला माझे नाव, माझ्या शाळेचे नाव, शिक्षकांचे नाव आणि आई-बाबांचा मोबाईल नंबर पाठ आहे. हातातमोबाईल न घेता मला तो नंबर सांगता येतो. यामुळे कधी नंबर हरविला तर मला विचारले जाते आणि मी सहज नंबर सांगतो.

- नावीन्य

पोरांना आठवते, मोठ्यांना का नाही?

लहान मुलांना आपण वारंवार सांगून नंबर पाठ करून घेतो. यामुळे शाॅर्ट मेमरी लाँग टर्म मेमरीमध्ये परिवर्तित होऊन नंबर लक्षात राहतो. मोबाईलमुळे मोठे व्यक्ती परावलंबी होऊन शाॅर्ट मेमरीचा वापर करीत नाही.

- डाॅ. श्रीकांत मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :Mobileमोबाइल