शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस

By admin | Updated: June 27, 2017 01:24 IST

शहरातील मंगळसूत्र चोरीची कडी वडगाव रोड पोलिसांच्या हाती लागली असून आरोपीने तब्बल नऊ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

सुवर्णकाराची कबुली : ११८ ग्रॅम सोने जप्त लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील मंगळसूत्र चोरीची कडी वडगाव रोड पोलिसांच्या हाती लागली असून आरोपीने तब्बल नऊ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी ११८ ग्रॅम सोने हस्तगत केले असून इतर गुन्ह्यांच्या शोधासाठी आरोपीची पोलीस कोठडी घेतली जाणार आहे. सराफा कारागीर सचिन नारायण चित्रयू (३५) रा. शास्त्रीनगर यवतमाळ असे वडगाव पोलिसांच्या हाती लागलेल्या मंगळसूत्र चोरट्याचे नाव आहे. त्याने शहरातील बोरेले ले-आऊट, नवप्रभात कॉलनी, गिलाणीनगर, कृषीनगर, ज्येष्ठ नागरिक भवन, महादेवनगर, सत्यसाईज्योत मंगल कार्यालय परिसरात, काळे-लेआऊट येथील घटनांची कबुली दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले होते. सातत्याने संधी मिळेल तिथे तो हात साफ करीत होता. मात्र गत आठवड्यात दर्डानगर परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र लंपास झाले. त्यानंतर सचिन चित्रयू पोलिसांच्या तावडीत सापडला आणि मंगळसूत्र चोरट्यांची कडीच हाती लागली. त्याने कबुल केलेल्या गुन्ह्यांपैकी दर्डानगर मंगळसूत्र चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याचा चुलत भाऊ मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा येथे राहतो. आरोपीने सोने तेथेच विकल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे शोध पथकासह तेथे जाऊन आले. परंतु काहीही हाती लागले नाही. सध्या कबुली दिलेल्या गुन्ह्यातील सोने जप्त करण्याची कारवाई सुरू असून त्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची न्यायालयात मागणी केली जाणार आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.