शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निळोणाची मुख्य जलवाहिनी फुटली

By admin | Updated: May 16, 2016 02:34 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पाची मुख्य पाईपलाईन रविवारी सकाळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले.

शहरावर पाणी संकट : १० दशलक्ष लिटर पाणी रस्त्यावर यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पाची मुख्य पाईपलाईन रविवारी सकाळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. परिणामी यवतमाळ शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवले असून अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. जीवन प्राधिकरणाने दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पाने तळ गाठला आहे. या प्रकल्पाच्या मृत साठ्यातून पाण्याचा उपसा सुरू आहे. निळोणा प्रकल्प ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत असलेली पाईपलाईन मिश्रा यांच्या शेताजवळ रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास फुटली. यामधून सुमारे दहा दशलक्ष लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. त्यामुळे यवतमाळ शहरावर पाणी संकट ओढवले. रविवारी ज्या भागाला पाणी पुरवठा होणार होता तेथे पाणीच पोहोचले नाही. याचा फटका पाटीपुरा, मेनलाईन, कळंब चौक, आरटीओ आॅफीस परिसर, सुराणा ले-आऊट, राजारामनगर, अलकबीर नगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, जामनकनगर आदी भागाला बसला. यवतमाळ शहरात यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. नागरिक पाण्याचा थेंबन्थेंब वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. तीन ते चार दिवसाआड नळाचे पाणी मिळत आहे. तेही अपुरे आहे. आता तर पाईपलाईन फुटल्याने अर्ध्या यवतमाळात पाणी संकट निर्माण झाले आहे. मुख्य पाईपचा शिशाचा जोड तुटल्याने ही पाईपलाईन फुटल्याचे सांगण्यात आले. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी युद्ध पातळीवर दुरुस्तीच्या कामाला लागले आहे. (शहर वार्ताहर) १९७२ ची पाईपलाईन निळोणा प्रकल्पावरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणारी पाईपलाईन १९७२ सालाची आहे. ही पाईपलाईन आता ठिसूळ झाली आहे. त्यामुळे वारंवार पाईपलाईनवर बिघाड निर्माण होतो. गत दोन वर्षापूर्वीही अशीच पाईपलाईन फुटली होती. त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. आता पुन्हा ही पाईपलाईन फुटली आहे. दुरुस्तीचे काम सुरू असले तरी नेमका पाणीपुरवठा सुरळीत कधी होईल, हे सांगणे कठीण आहे.