शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच दिवसा कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर राखणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर हेही बंधनकारक आहे. सार्वजिनक कार्यक्रम, मेळावे, सभा यावर बंदी आहे. 

ठळक मुद्देपाच जणांना एकत्र येण्यावर बंदी : कारवाईसाठी पोलीस व पालिकांची संयुक्त पथके

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी २८ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी हा आदेश जारी केला आहे. संचारबंदी व अन्य निर्बंधांचे पालन होते की नाही, यावर वाॅच ठेवण्यासाठी नगरपालिका, तसेच ग्रामपंचायत व पोलिसांची संयुक्त पथकेही गठित करण्यात आली आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच दिवसा कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर राखणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर हेही बंधनकारक आहे. सार्वजिनक कार्यक्रम, मेळावे, सभा यावर बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकणे हा गुन्हा आहे. थुंकल्यास दंड भरावा लागणार आहे, तसेच सार्वजिनक पान, दारू, तंबाखू आदींच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभाकरिता ५० जणांच्या, तर अंत्यविधीकरिता २० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असेल. खासगी आस्थापना ५० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील, तर निर्मिती उद्योग हे पूर्ण क्षमतेसह मात्र सोशल डिस्टन्स पाळून सुरू राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत, तर ठोक भाजीमंडई पहाटे ३ ते सकाळी ६ या काळात सुरू राहील. मात्र, तेथे किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश असेल. सभागृह, नाट्यगृह, मंगल कार्यालये यांनी उपस्थितीसंदर्भात नियमाचे पालन न केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रीय आपत्ती असेपर्यंत नियम मोडणारी मंगल कार्यालये बंद ठेवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.  

रुग्णांच्या हातावर मारणार शिक्केहोम आयसोलेशनमधील रुग्णांवर आता कठोर नजर ठेवली जाणार आहे. त्याच्या घरासमोर तो पाॅझिटिव्ह असल्याचा ठळक फलक लावला जाणार आहे. त्यात त्याच्या गृहविलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधीही नमूद असेल. तसेच कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  

शासकीय कार्यालयात बाहेरच्यांना ‘नो एन्ट्री’शासकीय कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी फक्त लोकप्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर या काळात अन्य अभ्यागतांना प्रवेश नसेल. अत्यावश्यक काम असेल तरच विभाग प्रमुखांची पास घेऊनच बैठकीसाठी जावे लागणार आहे. 

हाॅटेलला पार्सलची मुभासिनेमागृह, हाॅटेल्स, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद ठेवली जाणार आहे. मात्र हाॅटेल्सला रात्री ११ पर्यंत पार्सल सुविधा पुरविण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.  

या चुका कराल तर रोख पडेल दंड संचारबंदीचे उल्लंघन केल्यास प्रती व्यक्ती १ हजार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार मास्क न घातल्यास ५०० सार्वजनिक वाहतूक करताना निर्बंध न पाळल्यास ५००

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या