शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा येथे नवविवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: June 26, 2017 00:46 IST

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथील शास्त्री वार्डात रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सोनाली रुपेश बारसागडे (२४) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिने घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. आर्णी येथील हरिश कानडे यांची कन्या सोनाली आणि पांढरकवडा येथील रुपेश बारसागडे यांचा विवाह १७ एप्रिल २०१७ रोजी थाटात संपन्न झाला होता. लग्नापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस वार्डात परिवारासह एकत्र राहणारा रुपेश लग्नानंतर पत्नीसह शास्त्री वार्डात भाड्याने राहत होता. त्याचा पानठेल्याचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ७.३० वाजता तो पानठेल्यावर गेला. तत्पूर्वी पत्नीने त्याला नाश्ताही करून दिला होता. पती बाहेर गेल्यावर तिने दार लावून घेतले. इकडे सोनालीच्या खोलीचा दरवाजा आतून लावून दिसल्याने घरमालकीनने आवाज दिला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांना बोलावून दार तोडले असता सोनाली गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान सोनालीचा भाऊ विक्की कानडे याने पोलिसात तक्रार दाखल केली असून आपल्या बहिणीची आत्महत्या नसून तिचा खूनच करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी सोनालीचा पती रुपेश याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक असलम खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पिदूरकर तपास करीत आहे.