आॅनलाईन लोकमतकरंजी रोड : नऊ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील कान्हाळगाव येथे शनिवारी सकाळी १.३० वाजता घडली.वेदश्री रविकांत तोडासे (२१) असे मृत विवाहितेचे नाव आहे. नऊ महिन्यांपूर्वी रविकांत व वेदश्रीचा विवाह आदिलाबाद जिल्ह्यातील उटनूर येथे झाला होता. रविकांत तोडासे (२५) हा पांढरकवडा येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तो नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ६ वाजता कामासाठी निघून गेला. तर रविकांतची आई मंगला कापूस वेचण्यासाठी मजुरीने शेतात गेली होती. वेदश्री एकटीच घरी होती. दरम्यान, तिने विष घेतले. ही माहिती मिळताच वेदश्रीला तत्काळ करंजीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रविकांत हा भूमिहीन असून वेदश्रीने विष कोठून आणले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कान्हाळगावात नवविवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:55 IST
नऊ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील कान्हाळगाव येथे शनिवारी सकाळी १.३० वाजता घडली.
कान्हाळगावात नवविवाहितेची आत्महत्या
ठळक मुद्देविष घेतले : नऊ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह