शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कार्यकर्त्यांना ऊर्जा देणाऱ्या शक्तिस्थळाला नवी झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यवतमाळच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली. यवतमाळात अनेक विकासकामे खेचून आणली. त्यातीलच येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हेही एक आहे. याच महाविद्यालयाच्या पुढे बाबूजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ शक्तिस्थळ साकारण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर १९९७ ला बाबूजींचे निर्वाण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या बाबूजींनी आकाशाची उंची गाठल्यावरही जमिनीवरच्या आपल्या कार्यकर्त्यांचे कधीही विस्मरण होऊ दिले नाही. अन् त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनीही बाबूजींचे कार्य चिरस्मरणीय करण्यासाठी जीवाचे रान केले. त्यातूनच यवतमाळमध्ये आगळेवेगळे ‘शक्तिस्थळ’ उभे राहिले. या स्मृतिस्थळाचे उद्घाटन २० वर्षांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी केले होते, तर आता २० वर्षांनंतर कार्यकर्त्यांनी शक्तिस्थळाचे सौंदर्यीकरण करून त्याला आणखी  देखणे केले. नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन या स्थळाचे व त्यामागील कार्यकर्त्यांच्या धडपडीचे कौतुक केले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यवतमाळच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली. यवतमाळात अनेक विकासकामे खेचून आणली. त्यातीलच येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हेही एक आहे. याच महाविद्यालयाच्या पुढे बाबूजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ शक्तिस्थळ साकारण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर १९९७ ला बाबूजींचे निर्वाण झाले. त्यांच्या तालमीत वाढलेला अगदी सामान्य घरातला कार्यकर्ता मनोज रायचुरा यांनी हे शक्तिस्थळ साकारण्यासाठी पुढाकार घेतला.  या शक्तिस्थळाचे २९ ऑगस्ट २००१ रोजी महानायक अमिताभ बच्चन, जया भादुरी, तत्कालीन खासदार अमरसिंग, लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन तत्कालीन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-इन-चीफ तथा राज्याचे माजी शिक्षण व उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. गेल्या २० वर्षांपासून हे शक्तिस्थळ बाबूजींच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण यवतमाळकरांसाठी प्रेरक ठिकाण ठरले आहे. येथे दरवर्षी इंदिरा गांधी तसेच बाबूजींची जयंती-पुण्यतिथी हे निमित्त साधून कार्यकर्ते एकत्रित येतात.  बाबूजींपुढे नतमस्तक होतात. शिवाय मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे कोणतेही आंदोलन असो त्या आंदोलनाची सुरुवात याच शक्तिस्थळापासून होते.  हे शक्तिस्थळ घडविणारे मनोज रायचुरा यांनी नुकतेच त्याचे सौंदर्यीकरण आणखी देखणे केले आहे. येथे नवीन प्लास्टरिंग करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. आजूबाजूचा परिसरही सुशोभित करण्यात आला आहे. त्यासाठी  जिल्हा परिषद बांधकाम सभापती राम देवसरकर यांचे सहकार्य लाभल्याचे रायचुरा म्हणाले. 

दोन दशकापासून  स्मारक देतेय प्रेरणा - शक्तिस्थळ म्हणून नावारूपास आलेले बाबूजींचे हे स्मारक अत्यंत वेगळे आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा या दोघांच्याही भव्य भावमुद्रा येथे चितारण्यात आल्या आहेत. तळाशी संसद भवनाची प्रतिकृती, त्यावर दोन तळहात, मागे हिमालयाची प्रतिकृती त्यासोबत ‘भारत माता तेरी सेवा में ये दो जवाहर समर्पित’ असे घोषवाक्य साकारले आहे. २० वर्षांपासून यवतमाळातील तरुणांना देशसेवेची प्रेरणा देणारे हे स्मृतिस्थळ येणाऱ्या पिढ्यांसाठीही प्रेरणादायक ठरणार आहे.   

 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा