शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक श्रमदानातून रचला नवा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:18 IST

वॉटर कप स्पर्धेच्या निमित्याने आयोजित सामुहिक श्रमदान उपक्रमात पाणी अडविण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. दारव्हा तालुक्यात राबविण्यात आलेल्या अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून यामुळे नवा इतिहास रचला गेला. श्रमदानातून एकाच दिवसी तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : दारव्ह्यात तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमतेचे काम

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्याने आयोजित सामुहिक श्रमदान उपक्रमात पाणी अडविण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. दारव्हा तालुक्यात राबविण्यात आलेल्या अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून यामुळे नवा इतिहास रचला गेला. श्रमदानातून एकाच दिवसी तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली.बारा गावात विविध संघटना आणि गावातील नागरिक यांनी अडीच तासात दीड हजार घनमीटर काम केले. आता पावसाळ्यात या ठिकाणी किमान वीस दिवस जरी पाऊस पडला तरी तीन कोटी लीटर पाणी साठवून राहील. त्यामुळे याचा गावकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. पाणी फाऊंडेशनची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा संबंध महाराष्ट्रात होत असली तरी दारव्हा तालुक्यात मात्र उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे व तहसीलदार अरूण शेलार यांनी ज्या पद्धतीने लोकांना प्रोत्साहित करून कामाला लावले त्याला तोड नाही. स्पर्धेतील मुल्यांकनापूर्वीच हजारोंच्या संख्येनी शोषखड्डे, माती परीक्षण, रोप वाटिका, तयार करण्यात आल्या. रात्री १२ च्या ठोक्याला श्रमदानाने या स्पर्धेची सुरूवात झाली. या उपक्रमांतर्गत शहरातील बारा विविध संघटनांची निवड करण्यात येऊन गावकऱ्यांच्या साथीने त्यांच्या श्रमदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. पत्रकार संघटनेने लाख येथे सलग समतल चर खोदणे व दगडी बांधकामाकरीता सहकार्य केले. सलगचर तयार करण्यासाठी मॉर्निंग वॉक ग्रुपने हातोला, चैतन्य ग्रुप आॅफ स्पोर्टस्ने लोही, वकील संघटनेने भुलाई, मेडकील ग्रुपने खोपडी, डॉक्टर असोसिएशनने तपोना, महिला ग्रुपने कोलवाई, कृषि साहित्य विक्रेता संघाने माळेगाव येथे उपक्रमात सहभाग घेतला. अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, आरडीसी नरेंद्र फुलझेले, एसडीओ जयंत देशपांडे, तहसीलदार अरुण शेलार यांनी भेट देऊन श्रमदान केले.अबालवृद्धांचा सहभागअधिकारी, कर्मचारी, विविध संघटनामुळे, गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पहावयास मिळाले. श्रमदानात नवयुवकच नव्हे तर वृद्ध, लहान मुले, महिला आदींनी आपला सहभाग नोंदविला सर्वांनी झेपेल ते काम केले. उभेही राहू शकत नाही अशा वृद्धांनी दगड जमा करून दिले.