शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनातून नवीन ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:21 IST

आंबेडकरी साहित्य संमेलनातुन नेहमी नवीन ऊर्जा प्राप्त होते. अशी साहित्य संमेलने नवीन पिढीसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपदान खासदार सप्रिया सुळे यांनी केले.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे : उमरखेडमध्ये आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतउमरखेड : आंबेडकरी साहित्य संमेलनातुन नेहमी नवीन ऊर्जा प्राप्त होते. अशी साहित्य संमेलने नवीन पिढीसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपदान खासदार सप्रिया सुळे यांनी केले. त्या शनिवारी येथील आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.कोरेगाव-भीमा शौर्य दिन द्विशतकपूर्तीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकरी प्रबोधन पर्व समिती व दिशा सामाजिक संस्था उमरखेडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे शनिवारी थाटात उद्घाटन झाले. दिवंगत खासदार हरिहरराव सोनुले साहित्यनगरी व सत्यशोधक भाऊसाहेब माने विचारमंच येथे दोन दिवसांचे हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या उद्घाटपर भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे साहित्य संमेलन ही नवीन पिढीसाठी खूप महत्त्वाचे असून ती काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनावर कडाडून टिका केली. शासनाकडून मराठी भाषेला न्याय मिळत नसल्याने सर्वांनी मिळून मराठी भाषा वाचविण्यासाठी लढा उभा करण्याची गरज प्रतिपादीत केली. आपल्या ४५ मिनीटांच्या भाषणात त्यांनी साहित्य क्षेत्रातील नामवंतांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या साहित्य संमेलनातून मी नवीन ऊर्जा घेऊन जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी संमेलनाध्यक्ष आनंद गायकवाड उपस्थित होते. मंचावर स्वागताध्यक्ष डॉ. विजय माने, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, आमदार ख्वॉजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया व विजयराव खडसे, डॉ.आरती फुफाटे, देवानंद पवार, सभापती प्रवीण मिरासे, नगराध्यक्ष नामदेव ससाने, वसंतराव घुईखेडकर, अ‍ॅड. आशिष देशमुुख, ययाती नाईक, डॉ. अंकुश देवसरकर आदी उपस्थित होते.संचालन विलास भवरे, प्रास्ताविक अनिल काळबांडे यांनी केले. आभार प्रेम हनवते यांनी मानले. या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.शासनाचा केला निषेधमहाराष्ट्र शासनाने १३०० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मराठी भाषेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. मराठीचे अस्तित्वच संपविण्याचा हा प्रकार आहे. आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यानी मराठी भाषेचा अपमान सहन केला नसता. त्यांची खूप उणीव भासत आहे, असे प्रांंजळ मनोगत खासदार सुळे यांनी व्यक्त केले. शासनाच्या या निर्णयाविरूद्ध त्यांनी शासनाचा जाहीर निषेध केला. तसेच साहित्य संमेलनात निषेधाचा ठराव पारित करण्याची सूचनाही केली.