शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत नवे जिल्हा प्रमुख

By admin | Updated: July 4, 2015 02:46 IST

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळात शिवसेनेला नवे जिल्हा प्रमुख मिळणार आहेत. आठवडाभरात या नव्या शिलेदारांची घोषणा मुंबईतून केली जाईल.

आठवडाभरात घोषणा : माजी आमदारांसह अनेकांची मोर्चेबांधणी राजेश निस्ताने यवतमाळ अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळात शिवसेनेला नवे जिल्हा प्रमुख मिळणार आहेत. आठवडाभरात या नव्या शिलेदारांची घोषणा मुंबईतून केली जाईल. दरम्यान जिल्हा प्रमुख पदी वर्णी लावून घेण्यासाठी माजी आमदारांसह अनेकांनी फिल्डींग लावली असून काहींनी तर थेट ‘मातोश्री’पर्यंत धाव घेतली आहे. संजय राठोड गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत. जिल्हा प्रमुख असतानाच आमदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतरही अनेक वर्ष त्यांनी जिल्हा प्रमुख व आमदारकी या दोनही जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. मात्र आता त्यांची राज्यमंत्री मंडळात वर्णी लागली. एकावेळी जिल्हा प्रमुख, आमदार, राज्यमंत्री अशा तीन जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना कसरत करावी लागते. तीनही पदांना एकावेळी न्याय देणे शक्य होत नाही. म्हणून यवतमाळला नवे जिल्हा प्रमुख देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. त्या अनुषंगाने शिवसेनेचे संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर (मुंबई) यांनी नुकतीच येथे दोन दिवसीय मॅराथॉन बैठक घेतली. त्यात यवतमाळ शहरातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली गेली. उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांना स्वतंत्र वेळ दिला गेला. जिल्हाभरातील शाखा प्रमुखांना पहिल्यांदाच चर्चेत सामावून घेतले गेले. या त्रि-स्तरीय बैठकीतून जिल्ह्यातील शिवसेनेच्या सद्यस्थितीचा नेरुरकर यांनी अभ्यास केला. या अभ्यासातूनच आता जिल्ह्याला नवे नेतृत्व मिळणार आहे. जिल्हा प्रमुखपदी वर्णी लावून घेण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. कुणी उघड तर कुणी छुपी फिल्डींग लावून आहेत एवढेच ! शहरातील अनेक पदाधिकारी जिल्हा प्रमुख होण्याची मनिषा बाळगून आहेत. मात्र उघडपणे रिंगणात उतरून स्थानिक श्रेष्ठींशी वाईटपण घेण्याची त्यांची तयारी नाही. एक-दोन पदाधिकाऱ्यांनी तर थेट ‘मातोश्री’पर्यंत मोर्चेबांधणी केली. खासदार अनिल देसाई यांच्यामार्फत थेट उद्धव ठाकरेंपर्यंत भावना पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. मात्र आपले म्हणणे संपर्क प्रमुखामार्फत पाठवा, असे म्हणून या इच्छुकांना विश्वनाथ नेरुरकरांच्या दरबारात परत पाठविले गेले. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवा जिल्हा प्रमुख हा राज्यमंत्री संजय राठोड यांच्याच मर्जीतील कुणी तरी होईल, असा राजकीय अंदाज आहे. मात्र संपर्क प्रमुख बदलल्याने यावेळी वेगळा निकाल पहायला मिळेल, असा विश्वास निष्ठावंत शिवसैनिक व्यक्त करीत आहे. जिल्हा प्रमुख पदासाठी वणीचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. नांदेकर यांना नियुक्ती देऊन बाळासाहेब मुनगीनवार यांना जिल्हा प्रमुख पदावर कायम ठेवले जाण्याची शक्यताही शिवसेनेच्या गोटात वर्तविली जात आहे. केंद्रिय मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या खासदार भावना गवळी यांचा जिल्ह्यात स्वतंत्र असा कोणताही गट नाही. मात्र त्या आपले वजन कुणाच्या पारड्यात टाकतात हे पाहणेही तेवठेच महत्वाचे ठरते. संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर यांच्या कार्यशैलीवर सामान्य शिवसैनिक खूश आहेत. त्यामुळेच यावेळी निष्ठावंत व सामान्य कार्यकर्त्यांपैकीच एखाद्याच्या गळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची माळ घातली जाईल, असा विश्वास शिवसैनिकांना वाटतो आहे.