रूंझा : नवीनच खरेदी केलेल्या कारला पिंपळशेंडा फाट्याजवळ बुधवारी दुपारी ५.३० वाजता अपघात झाला. यात तीन जण जखमी झाले असून त्यांना उमरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये पुरुष, महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. वणी येथील या कुटुंबाने आजच नवीन वाहन खरेदी केले. हार, रिबनने सजविलेली कार वणीकडे जात असताना पिंपळशेंडा फाट्याजवळ नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली उतरली. या घटनेत कारमधील तिघेही जखमी झाले. परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर जखमींना तत्काळ उमरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. (वार्ताहर)
पिंपळशेंडाजवळ नवीन कारला अपघात
By admin | Updated: April 23, 2015 02:11 IST