शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये कडकडीत बंद

By admin | Updated: December 24, 2015 03:08 IST

प्रस्तावित पुसद जिल्हा निर्मितीमध्ये नेर व दारव्हा तालुक्यांचा समावेश होत असल्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ....

तहसीलवर मोर्चा : पुसद जिल्ह्यात नेरचा समावेश करण्यास विरोधनेर : प्रस्तावित पुसद जिल्हा निर्मितीमध्ये नेर व दारव्हा तालुक्यांचा समावेश होत असल्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नेर तालुक्याचा पुसद जिल्ह्यात समावेश स्वीकारण्यात येवू नये, या मागणीसाठी शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.प्रस्तावित पुसद जिल्ह्यामध्ये नेर व दारव्हा तालुका समाविष्ट करण्याच्या प्रशासनाच्या छुप्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. प्रशासनाने नेर तालुक्याचा कोणताही भौगोलिक अभ्यास न करता घेतलेल्या या निर्णयाचा नागरिकांमधून विरोध होत आहे. सर्वसामान्य नेर व दारव्हा तालुक्यातील नागरिकांच्यादृष्टीने हा निर्णय अतिशय गैरसोयीचा आहे. नेर शहर संघर्ष समितीच्यावतीने या बाबीचा निषेध करण्यात येवून स्वयंस्फूर्तीने बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. शहरातील मुख्य बाजार ओळीतून निषेध मोर्चा काढण्यात येवून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. त्याठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली. या मोर्चात शहरातील सर्व लहान-मोठे प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. आजच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे संघर्ष समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. नेर व्यापारी असोसिएशन, तालुका वकील संघ, फोटोग्राफर संघटना, पत्रकार संघटना आदी या बंदमध्ये सहभागी झाले होते. सभेनंतर तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये संभाव्य पुसद जिल्हा हा नेर व दारव्हा तालुक्यातील नागरिकांसाठी गैरसोयीचा ठरणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबतचा खात्रीलायक खुलासा करावा आणि नेर व दारव्हा तालुक्यांना यवतमाळ जिल्ह्यातच कायम ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी संतोष अरसोड, पुरुषोत्तम लाहोटी, नितीन माकोडे, गणेश राऊत, साजीद सेठ, अश्विन दावडा, गजानन काळे, प्रवीण पाटमासे, प्रदीप आडे, नाना घोंगडे, गौरव नाईकर, सोनू ठाकरे, पंजाबराव शिरभाते, अशोक खंडरे, रूपेश गुल्हाने, अजिंक्य येळणे, अजिंक्य काडगळे, विकास जामनकर, नितीन कराळे, सचिन कराळे, मोहन पापळकर, समीर तोटे, बाळू चिद्दरवार, किशोर पासुळकर, गुंजन दारव्हटकर, सागर गुल्हाने आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)