शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ना एसटीचा टायमिंग, ना चौकशी कक्षाचा बोर्ड; समोर प्रवासी आणि मागे कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 18:53 IST

बसस्थानकातील खड्ड्यात अपघातांची मालिका : ज्येष्ठांना एक प्रकारची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाचे यवतमाळचे बसस्थानक समस्यांचे माहेरघर झाले आहे. या ठिकाणी दररोज नवीन समस्यांचा उदय होतो. प्रवाशांच्या सेवेसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा अचूक अंदाज मिळावा म्हणून ट्रॅकर सिस्टीम तयार करण्यात आली. त्यासाठी स्मार्ट टीव्ही लागला. मात्र माहिती देणारी यंत्रणाच नाही. इतकेच नव्हे तर वाहनांची माहिती सांगणारे चौकशी कक्षाचे बोर्ड फाटले आहे.

यवतमाळच्या बसस्थानकाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मनस्ताप निर्माण होतो. आपण या ठिकाणी आलोच कशाला. आणि या अस्वच्छ वातावरणात राहायचे कशाला असे म्हणून अनेकजन नाके मुरडतात. मात्र पर्याय नसतो, या स्थितीत प्रवाशी बसस्थानकावर ये-जा करतात. त्यात पाय घसरून अनेकजण बसस्थानकातच पडतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे अनेक ज्येष्ठांनी बसस्थानकावर न जाणेच सरू केले. 

चौकशी कक्षात त्या यंत्राचा उपयोग काय?प्रवाशांना बाहेर ठिकाणावरून यवतमाळात येणाऱ्या बसगाडी किती दूर अंतरावर आहे. त्या गाडीचा वेग किती आहे. ही गाडी किती वेळात येणार आहे याची संपूर्ण माहिती यामध्ये दर्शविली जाते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हा डिस्प्ले बोर्ड बंद आहे. यामुळे हा डेस्प्ले बोर्ड केवळ नावालाच उरला आहे.

निवाऱ्यात कचरा आणि पाण्याचे डबकेबसस्थानकाच्या आतमध्ये असलेल्या टिनाच्या शेडच्या निवाऱ्यात कुठलीच व्यवस्था नाही. या ठिकाणी एसटीचे दोन बाकडे आहे. त्यावर नागरिकांना बसावे लागते.

अपुऱ्या जागेने प्रवाशांची धावाधावबसस्थानकाच्या आतमध्ये पाण्याचे जागोजागी डबके साचले आहे. त्यातही अपुरी जागा असल्याने एसटी बस कुठल्या बाजूने लागेल याचा नेमच नसतो. यातून प्रवाशी बसस्थानकाच्या मध्यभागी उभे राहतात. यातही चिखल, गाटा तुटवडीत प्रवाशांची धावपळ होते. मात्र वयावृद्ध प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसतो.

प्रवाशी काय म्हणतात..."शाळेसाठी दररोज बसस्थानकावर यावे लागते. मात्र तासनतास बस लागत नाही. त्यातही बसण्याकरिता चांगली सुविधा नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची फजिती होते. या परिस्थितीने अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत."- सरिता नेवारे

"बसस्थानकाची बकाल अवस्था पाहून आतमध्ये पायही ठेवण्याची हिंमत होत नाही. यातून जास्त प्रमाणात आजार पसरण्याचाच अधिक धोका वाटतो. एसटी परिवहन विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्या."- रमेश ढंगारे

टॅग्स :Yavatmalयवतमाळ