शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला पर्याय उभा करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 05:00 IST

अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल होवून ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ हा मार्ग अवलंबू लागला आहे. ही परिस्थिती का आली, याचे अध्ययन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे सर्वेक्षण; चार जिल्ह्यांमध्ये केला अभ्यास

n  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांनी बहुतेक क्षेत्र व्यापल्याने पिकांचा फेरपालट होण्यासाठी फारसे पर्याय राहिलेल नाही. मागील पाच वर्षातील सोयाबीन पिकांच्या उत्पन्नाचा आढावा घेतला असता सोयाबीनला पर्यायी पीक उभे करण्याची गरज दिसून येत आहे. हा निष्कर्ष यवतमाळ येथील सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनातून काढण्यात आला आहे. अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल होवून ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ हा मार्ग अवलंबू लागला आहे. ही परिस्थिती का आली, याचे अध्ययन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि नांदेड या जिल्ह्याच्या २२ तालुक्यातील ९४ गावात ४४२ शेतकऱ्यांच्या भेटी घेवून या विद्यार्थ्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. तसा अहवाल तयार करण्यात आला. ५० टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सदोष असल्याने दुबार पेरणी करावी लागली. अशा बियाण्यांबाबत कंपन्यांसह शासकीय यंत्रणेवर कठोर कारवाई व्हावी, शक्य झाल्यास शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने बियाण्यांचे संरक्षण करावे, असा निष्कर्ष सोयाबीनबाबत मांडण्यात आला आहे.देशातील शेतमालाचे दर इतर जीवनावश्यक नसणाऱ्या गोष्टींच्या तुलनेत खूप कमी आहे. किमान उत्पन्न मिळविणाऱ्या कुटुंबालासुद्धा ते परवडणारे आहे. या दरामध्ये कुठल्याही कारणाने थोडी वाढ झाली की आकांत करणे आपण थांबविले पाहिजे, असे अहवालात नमूद केले आहे. नुकसान झाल्यानंतर पिकांचा विमा मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. विमा कंपन्यांनी तात्काळ भरपाई द्यावी, अशा सूचना शासनाने या कंपन्यांना कराव्या, अशी शेतकरी वर्गाची     विनंती असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रा. घनश्याम दरणे, प्रा. सीमा शेटे, प्रा. कल्पना राऊत, प्रा. प्रशांत कराळे या संशोधक गटाने शेती आणि शेतकरी याबाबत सर्वेक्षणात अनेक निष्कर्ष काढले आहेत.या अहवालाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांच्या हस्ते समाजकार्य महाविद्यालयात झाले. अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. रमाकांत कोलते हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डाॅ. अविनाश शिर्के यांनी केले. प्रा. घनश्याम दरणे यांनी अनुभव सांगितले. संचालनाची जबाबदारी प्रा.डाॅ. सीमा शेटे यांनी पार पाडली.

टॅग्स :agricultureशेती