शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील आदर्श शोधायची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:46 IST

आपल्या जगण्यातून माणुसकीचे नाते सिद्ध करणारे असंख्य आदर्श माणसे गावोगावी आहेत.

ठळक मुद्देअरविंद देशमुख : अभियंता ग्रुपतर्फे व्याख्यान, अभियंत्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपल्या जगण्यातून माणुसकीचे नाते सिद्ध करणारे असंख्य आदर्श माणसे गावोगावी आहेत. माणसात देवत्व शोधणारे कर्मयोगी वेगवेगळ्या प्रकारे समाजसेवा करीत आहेत. प्रत्येकाची तºहा वेगळी असली तरी, या जन्मावर या जगण्यावर प्रेम करणारी आदर्श माणसे समाजात आहेत. गरज आहे ती त्यांचा शोध घेण्याची आणि त्यांच्याप्रमाणे आपल्या जीवनाला दिशा देण्याची, असे विचार प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी मांडले.जिल्हा अभियंता ग्रुपद्वारे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया जयंती निमित्त येथील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात ‘या जन्मावर या जगण्यावर’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी ‘कसं जगावं’ या विषयावर दिलखुलास मत व्यक्त केले.अध्यक्षस्थानी जिल्हा अभियंता ग्रुपचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता योगेश लाखानी होते. अभियंता प्रदीप कुळकर्णी, अभियंता सोहन मडघे, अभियंता अमित मिश्रा, अभियंता सुनील मुटकुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.डॉ. देशमुख पुढे म्हणाले, जगताना माणसाने वर्षाऋतुच्या मोरासारखे संपूर्ण पिसारा फुलवून जगावे. दैनंदिन जीवन जगताना आयुष्य नुसतेच वाहून गेले, अखरे जगायचे राहून गेले, असे वाटता कामा नये. जीवन अर्थपूर्ण जगण्याचा ध्यास असावा लागतो. आपल्या मुलांकडे संपत्ती संक्रमित करताना सामाजिक सद्भावनाही संक्रमित केली तर जगण्याचे मूल्य निश्चितच वाढते. इतरांसाठी जगणे हीच माणुसकीची ओळख आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील असामान्य कर्तृत्व करणाºयांची ओळख त्यांनी आपल्या भाषणात करून दिली.यावेळी अभियंता ग्रुपद्वारे गुणवंत पाल्यांचे कौतुक, पदोन्नत अभियंत्यांचा आणि निवृत्त अभियंत्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अभियंता विलास चावरे यांनी केले. यावेळी वेगवेगळ्या विभागातील अभियंते सहकुटुंब उपस्थित होते.