शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजाबद्दल इतरांची मानसिकता बदलण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:12 IST

कुणबी समाजच शेती व्यवसाय, वतनदारी, राजकारणात पुढे असल्याची मानसिकता इतर समाजात निर्माण झाल्याने अनेकदा रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे इतरांची मानसिकता बदलून सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे,.....

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे : दारव्हा येथे राज्यस्तरीय मराठा-कुणबी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कुणबी समाजच शेती व्यवसाय, वतनदारी, राजकारणात पुढे असल्याची मानसिकता इतर समाजात निर्माण झाल्याने अनेकदा रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे इतरांची मानसिकता बदलून सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे मत विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.माजी आमदार दिवंगत बाळासाहेब घुईखेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे राज्यस्तरीय सर्व शाखेय मराठा-कुणबी समाज उपवर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षीय भाषणात ना.ठाकरे बोलत होते. खासदार भावनाताई गवळी, व्यसनमुक्ती सम्राट मधुकरराव खोडे महाराज, माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार विजयाताई धोटे, अ‍ॅड. जीवन पाटील, सुरेखाताई ठाकरे, सुशीलाताई पाटील, विजयाताई घुईखेडकर, पुष्पाताई नागपुरे आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले, सध्याची सामाजिक स्थिती बघता असे कार्यक्रम घेऊन शक्तीप्रदर्शन करणे महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षण, क्रिमिलेअर यावर राज्य सरकारवर टीका करीत समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची त्यांनी ग्वाही दिली. खासदार भावना गवळी, मधुकरराव खोडे महाराज, राजाभाऊ ठाकरे, विजयाताई धोटे, सुरेखा ठाकरे आदींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपवर-वधुंची संपूर्ण माहिती असणाºया परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात दोनशेच्यावर उपवर-वधुंनी आपला परिचय दिला. यशस्वीतेकरिता आयोजक डॉ. संगीता वसंतराव घुईखेडकर व सर्व शाखेय महिला मराठा-कुणबी समाज व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.