शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

भेसळयुक्त पदार्थापासून सावध राहण्याची गरज

By admin | Updated: October 22, 2014 23:26 IST

सणासुदीच्या विशेषत: दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळीची शक्यता असते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यवतमाळ : सणासुदीच्या विशेषत: दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळीची शक्यता असते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने नागरिकांनी कोणतेही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी सावधानता बाळगण्याचे आवाहन अन्न व औषधी प्रशासन विभागाने केले आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये खाद्यपदार्थांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषत: दुधजन्य पदार्थांना या काळात मोठी मागणी असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे अशा पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक असते. इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा भेसळयुक्त खवा पकडण्याच्या घटना घडल्या आहेत. यवतमाळ जिल्हयात मात्र अद्याप यावर्षी असा प्रकार उघडकीस आला नाही. परंतु तरीदेखील ग्राहकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.खव्यापासून बनविण्यात आलेल्या विविध पदार्थांना ज्या प्रमाणात मागणी असते त्या प्रमाणात खवा उपलब्ध होत नसल्याने भेसळयुक्त खव्याची विक्री अशा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. स्थानिक विक्रेत्यांशिवाय बाहेरगावहून आणि इतर प्रांतातूनही असा खवा विक्रीस येतो. अशा खव्यापासून बनविण्यात आलेले पदार्थ निश्चितच आरोग्यास हानीकारक असतात. दुकानांमध्ये आकर्षक पॅकींगमध्ये वेगवेगळ्या मिक्स मिठाई सजविलेल्या असतात. असे पदार्थ पाहून कुणालाही ते घेतल्यावाचून राहवत नाही. परंतु असे पदार्थ घेताना खात्रीपूर्वक दुकानातूनच ते खरेदी करणे आवश्यक आहे. शिवाय आपण खरेदी करीत असलेल्या पदार्थांचे पक्के बील घेणे गरजेचे आहे. कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी एमआरपी व एक्सपायरी तारीख पाहून घ्यावी. कालबाह्य तारखेतील पदार्थ घेऊ नये. मिळायांसोबतच किराणा दुकानातील साहित्य खरेदी करतानासुद्धा काळजी बाळगणे गरजेचे आहे. काही दुकानांमध्ये वर्षभरात न खपलेला कालबाह्य माल दिवाळीतील गर्दी पाहून विक्रीस काढण्यात येतो. तेंव्हा ग्राहकांनी खात्रीच्याच दुकानातून आणि नीट पाहणी केल्यानंतरच अशा मालाची खरेदी करणे आवश्यक आहे. आपली कोणतीही फसवणूक होणार नाही, याबाबत ग्राहकांनी स्वत: तत्पर असणे केंव्हाही चांगले. त्यानंतरसुद्धा ग्रहकांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यास त्यांनी त्वरित अन्न औषधी प्रशासनच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधून लेखी तक्रार करावी, तसेच अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेला कळवावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नितीन कापसे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)