शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली

By admin | Updated: June 8, 2014 00:09 IST

राज्यपालांच्या कोट्यातून आर्णीच्या ख्वाजा बेग यांना विधानपरिषद सदस्यत्व मिळाल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी वाढली आहे.

ख्वाजा बेग विधानपरिषदेवर : एक मंत्री, दोन आमदारयवतमाळ : राज्यपालांच्या कोट्यातून आर्णीच्या ख्वाजा बेग यांना विधानपरिषद सदस्यत्व मिळाल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी वाढली आहे.मनोहरराव नाईक यांच्या निमित्ताने पुसदचा गड आणि मंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. संदीप बाजोरिया हे राष्ट्रवादीचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषद सदस्य आहेत. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता आहे. यवतमाळ पंचायत समितीसुद्धा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि सहकारातील संस्था राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या ताब्यात आहेत. त्यातच आता ख्वाजा बेग यांना आमदारकी देवून पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढविली आहे. काँग्रेसकडून अल्पसंख्यकांना नेहमीच खूश करण्याचा प्रयत्न होतो. त्यात आता आपणही मागे नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवून दिले आहे. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विधानपरिषद सदस्यांची संख्या आता समान झाली आहे. गेल्यावेळी सात पैकी केवळ पुसद या एका विधानसभा मतदारसंघात लढणार्‍या राष्ट्रवादीने यावेळी यवतमाळ व दिग्रस या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यातही यवतमाळ मतदारसंघासाठी त्यांचा आग्रह आहे. अनेक वर्षांपासून जणू राजकीय अज्ञातवासात असलेल्या ख्वाजा बेग यांना विधानपरिषदेवर संधी देवून मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. त्याचा कितपत फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. १९९९ च्या निवडणुकीत संजय देशमुख यांच्याविरोधात १२६ मतांनी पराभूत झाल्यानंतर ख्वाजा बेग यांना पुनर्वसनाचा शब्द दिला गेला होता. मात्र हा शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तब्बल १२ ते १४ वर्ष लागली, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)