शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

नाईकांचा दबदबा कायम

By admin | Updated: October 19, 2014 23:19 IST

पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहरराव नाईक यांनी ९४ हजार १५२ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांनी शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांचा पराभव करून राष्ट्रवादीचा

पाचव्यांदा विजय : ६५ हजारांचे मताधिक्य, शिवसेनेला नाकारले अखिलेश अग्रवाल/अशोक काकडे- पुसदपुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहरराव नाईक यांनी ९४ हजार १५२ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांनी शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांचा पराभव करून राष्ट्रवादीचा गढ अबाधित राखला आहे. रविवारी सकाळी ८ वाजता येथील बचत भवनात कर्नाटक येथून आलेले निवडणूक निरिक्षक मीर अनिस अहमद यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत जाजू व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्या चमुने मतमोजणीला सुरूवात केली. मनोहरराव नाईकांनी पहिल्या फेरीपासून २१ व्या फेरीपर्यंत मतांची आघाडी कायम ठेवली. मत मोजणीच्या २२ फेऱ्या झाल्या. प्रशासकीय यंत्रणेचे मिडिया सेंटरकडे दुर्लक्ष असल्यामुळे यावेळी वेळेवर माहिती प्रसारमाध्यमांना मिळत नव्हती. मतमोजणीचे काम संथगतीने सुरू होते. पहिली फेरी ९ वाजता पूर्ण झाली. २२ वी अंतिम फेरी पूर्ण होण्यास २ वाजले तर निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत जाजू यांनी २.३० वाजता अंतिम निकाल जाहीर केला. त्यानंतर मनोहरराव नाईक यांना विजयाचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी उपसभापती विजय जाधव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहोटे उपस्थित होते. प्रमाणपत्र घेतल्यानंतर कार्यकर्त्यांसह मनोहरराव नाईक बचत भवनातून बाहेर पडत असतानाच त्यांनी उपस्थित जनता व पत्रकारांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर ते आपल्या बंगल्याकडे गेले. उल्लेखनीय म्हणजे मनोहरराव नाईक हे कधीही विजयी रॅली काढत नाहीत. ही परंपरा त्यांनी यावेळीसुद्धा कायम ठेवली. पुसद मतदारसंघात एकूण ६७० एवढी पोस्टल मते होती. त्यातील सर्वाधित ४२६ मते मनोहररावांनी घेऊन येथेही आघाडी मिळविली. त्या खालोखाल सेनेचे प्रकाश देवसरकर यांनी ८६, काँग्रेसचे सचिन नाईक यांनी ४३ व भाजपाचे पाटील यांनी ६० पोस्टल मते मिळविली. पुसद विधानसभा निवडणुकीत यावेळी एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी काँग्रेस-भाजपा व बसपा उमेदवारासह १२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. भाजपाचे वसंतराव पाटील तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसचे सचिन नाईक चौथ्या क्रमांकावर राहिले. अपक्ष उमेदवार विशाल जाधव यांनी ५ हजार ५३५ मते घेऊन ते पाचव्या स्थानी राहिले. २२ व्या फेरीत सेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांना अनामत रक्कम वाचविता आली. त्यानंतरच्या प्रत्येक फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहरराव नाईक यांनीच आघाडी घेतली. पुसद मतदारसंघात २ लाख ८१ हजार ५६१ एकूण मतदार असून, १ लाख ७२ हजार ३८९ मतदारांनी यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी राष्ट्रवादीचे नाईक यांना ९४ हजार १५२ मते मिळाली. त्यांच्या मतांची ही टक्केवारी ५५ आहे.