शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

माहूरगडावर नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी

By admin | Updated: October 3, 2015 02:22 IST

श्रीक्षेत्र माहूर गडावर १३ ते २२ आॅक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार आहे.

आढावा बैठक : प्रशासक मंडळ व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहितीमाहूर : श्रीक्षेत्र माहूर गडावर १३ ते २२ आॅक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. श्री रेणुकादेवी मंदिरावर प्रशासक मंडळाने भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद यावलकर तसेच जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी गुरुवारी याबाबत आढावा बैठक घेतली. तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची बैठक गुरुवारी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी देवदेवेश्वर संस्थान, वस्तू संग्रहालय, पांडवलेणी, सोनापीर दर्गा, मातृतीर्थ तलाव, यात्री निवास, दत्त शिखर संस्थान, अनसूया माता मंदिर, शेख फरीद धबधबा, रेणुकादेवी मंदिर आदी ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. सर्वांगीण विकासाकरिता २९ कोटी रुपयांपैकी २४ कोटी रुपये विविध कामांवर खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित निधी पुढील दोन टप्प्यात प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले. बैठकीस जयवंतराव पाटील कामारीकर, प्रा.राजेंद्र केशवे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा नियोजन अधिकारी राठोड, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.दुर्गादास रोडे, उपविभागीय अधिकारी रोडगे, कार्यकारी अभियंता धारासूरकर, चव्हाण, तहसीलदार डॉ.आशिष बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण, मुख्याधिकारी डोईफोडे आदी उपस्थित होते. प्रशासकीय समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, डॉ.आशिषकुमार बिरादार, भवानीदास भोपी, विनायक फंदाडे, चंद्रकांत भोपी, सतीश भोपी, श्रीपाद भोपी, संजय कन्नव, आशिष जोशी यांच्यासह कार्यालय अधीक्षक पी.डी. चव्हाण यांनीही स्वच्छ पाणी, महाप्रसाद, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा यासाठी बैठक घेऊन रंगरंगोटीसह तयारी पूर्ण केली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १३ रोजी पुजारी भवानीदास रेणुकादास भोपी व शुभम संभाजी भोपी यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता महापूजेस प्रारंभ होईल. मुख्य गाभाऱ्यातील घटस्थापना व परिवार देवता श्री तुळजाभवानी माता, श्री महालक्ष्मी माता, श्री भगवान परशुराम मंदिरातील घटस्थापना होईल. २२ आॅक्टोबर रोजी पुजारी विनायक नारायण फांदाडे व चंद्रकांत देवीदास रिठे यांच्या हस्ते सकाळी ध्वज पूजन, श्री रेणुका मातेची महापूजा व महाआरती होईल. दुपारी शस्त्रपूजन, भगवान परशुरामाची पालखी, सीमोल्लंघन, आरती, महाप्रसाद यासह श्री रेणुकादेवी नवरात्र महोत्सवाची समाप्ती होणार आहे. (वार्ताहर)भाविकांमध्ये उत्सुकतामाहूरगडावरील रेणुकादेवीचे भक्त यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. दरवर्षी नवरात्रौत्सवात हजारो जिल्हावासी माहूरगडावर जात असतात. अनेक भाविक पदयात्राही काढत असतात. यंदा विविध सुविधांमध्ये वाढ झाल्याने नवरात्रोत्सवाबद्दल माहूरगडावर जाणाऱ्या भाविकांत उत्सुकता आहे.