शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसमध्ये नवरात्रोत्सवाची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:15 IST

शहरासह तालुक्यात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली असून येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. शक्तीस्वरुपाची अनंत रुपे आहे.

ठळक मुद्देरेणुका देवी : विहिरीतून प्रगटलेली माता, भक्तांची मांदियाळी

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहरासह तालुक्यात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली असून येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे.शक्तीस्वरुपाची अनंत रुपे आहे. त्यात जगदंबेचे महात्म्य अपार आहे. शहरात स्वयंभू अखंड शक्तीपीठ आहे. हे शक्तीपीठ जिल्ह्यातच नव्हे, तर बाहेर जिल्ह्यातील भक्तांचे आराध्य स्थान आहे. याच रेणुका मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला. परिसरातील भाविकांची मंदिरात मंदियाळी आहे.शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात रेणुका भवानी मातेचे मंदिर आहे. हे पुरातन मंदिर हेमाडपंथी होते. त्याचे अवशेष आजही कायम आहे. मंदिर एक हजार वर्षापूर्वीचे असावे, असा अंदाज येथे आढळलेल्या शिळावरून बांधण्यात येतो. हरिभाऊ शिंदे यांना एक रेखीव शिळा आढळली. त्यांनी ती शिळा शहरातील कस्तुरे नामक व्यक्तीला दाखविली. ती अश्वमेघ शिळा असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी अश्वमेघ यज्ञ केला जातो, त्याचे स्मरण व्हावे, म्हणून तेथे अशी शिळा ठेवली जाते, असे सांगण्यात येते.एक शिळा रेणुका मातेच्या मंदिराजवळ सापडली असून ती शिळा महाद्वारातून प्रवेश करताना उजव्या हातावर लावलेली आहे. बाजूला लहान-लहान मूर्त्या आहे. त्यात तुळजापूरची तुळजाई आहे. एक कालभैरवी आणि एक गरूडावरची सुंदर मूर्ती आहे. येथील रेणुका माता तांदळाच्या रुपात असून तिला पिवळा मुखवटा आहे. तीन बाय तिनच्या चौथऱ्यावर ही मूर्ती विराजमान असून हा चौथरा म्हणजे विहीरच आहे.ही देवी स्वयंभू असून ती विहिरीतूनवर आल्याचे सांगण्यात येते. दत्तात्रेय महाराज हे माहुरला जाताना दिग्रसला भवानी मातेच्या टेकडीखाली बसले होते. त्यांनी एका वृक्षाचा सहारा घेत विश्रांती घेतली. त्यामुळे या टेकडीला ‘दत्ताची टेकडी’ असे म्हटले जाते. दर पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.४0 वर्षांपासून आणली जाते ज्योतगेल्या ४0 वर्षांपासून देशातील विविध शक्तीपीठातून शहरात आणलेली ज्योत रेणुका मातेच्या मंदिरात प्रज्वलित केली जाते. शहरातील घरोघरी या ज्योतीवरूनच नऊ दिवसाचे नंदादीप प्रज्वलित करण्यात येतात. नवरात्रोत्सवाच्या पर्वावर भवानी मातेच्या दर्शनासाठी भक्तांची पहाटे ४ वाजतापासूनच गर्दी होते. बालक, महिला, पुरुष, युवक, युवती दर्शनासाठी भवानी टेकडीच्या मंदिरात गर्दीचा मेळ घालतात.