शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या नवरदेवाने ५० लाखांसाठी लग्न मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

ऐन शेवटच्या घटकेला पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख मागत विवाह करण्यास नकार दिला. यात वधूपित्याला तब्बल ३ लाख ८६ हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वधूपित्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कलम ४१७, ४२०, ५००, ५०४, ३४ भादंवि व सहकलम ४ हुंडा प्रतिबंधक अधिनियम यानुसार गुन्हे दाखल केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुला-मुलीची पसंती झाली. लग्नाचा मुहूर्त ठरला. जेवणाचा मेन्यूही निश्चित केला. मनपसंद कपडे, दागिन्यांची खरेदी केली. बोलणीपेक्षा अधिक खर्च होत असला तरी वधूपित्याने मुलीच्या हौसेखातर त्याकडे कानाडोळा केला. उत्साहाने लग्नाच्या पत्रिका वाटल्या. ऐन लग्नाच्या चार दिवस अगोदर मुलाने पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ५० लाखांची मागणी केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यवतमाळातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरात राहणाऱ्या सुस्वरूप कमावत्या मुलीचा मोठ्या उत्साहात वडिलांनी पुसद  येथील मुलगा रुपेश राजेंद्र नाईक (३०, रा. मंगलमूर्तीनगर) याच्याशी विवाह जुळविला. मुला-मुलीच्या पसंतीनेच वडिलांनी निर्णय घेतला. देण्याघेण्याची बोलणी झाली. त्यात मुलाला ५० हजारांचे कपडे व ३० ग्रॅम सोने मुलीच्या पित्याने देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे अमरावती येथे मुलाने ५० ऐवजी ८५ हजारांचे कपडे खरेदी केले. सोन्याचे दागिनेही ३० ग्रॅमवरून ३८ ग्रॅम घेतले. याचे रोख पैसे मुलीच्या वडिलांनी तत्काळ दिले. या दोन्ही खरेदीच्या पावत्या मुलाने स्वत:च्या नावे बनवून जवळच ठेवून घेतल्या. हा डाव वधूपित्याच्या लक्षात आला नाही. त्यांनी पत्रिका छापून नातेवाइकात वितरित केल्या. यवतमाळातील शोभिवंत अशा मंगल कार्यालयात विवाह सोहळा निश्चित केला. ११ जून रोजी हा विवाह होणार होता. मात्र, त्यापूर्वीच मुलाने ५० लाखांची मागणी करीत विवाह मोडला. यासाठी त्याला त्याचे वडील राजेंद्र श्यामराव नाईक (६०), आई पद्मिनी राजेंद्र नाईक (५७) यांच्यासह नात्यातील व्यक्ती सिद्धार्थ भगत (५०, रा. कारंजा जि. वाशिम), भीमराव उंदरे (५५, रा. पुस)  यांनी लग्न तोडण्यासाठी परावृत्त केले. ऐन शेवटच्या घटकेला पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख मागत विवाह करण्यास नकार दिला. यात वधूपित्याला तब्बल ३ लाख ८६ हजारांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वधूपित्याने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कलम ४१७, ४२०, ५००, ५०४, ३४ भादंवि व सहकलम ४ हुंडा प्रतिबंधक अधिनियम यानुसार गुन्हे दाखल केले. 

परिवारासह मुलगा झाला पसार - पन्नास लाखांच्या हुंड्यासाठी शेतकरी असलेल्या वधूपित्याला लग्नाच्या चार दिवस अगोदर अश्लील शिवीगाळ केली. नंतर राजेंद्र नाईक, मुलगा रुपेश नाईक, आई पद्मिनी नाईक हे पुसद येथील घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेले. त्यांनी मुलीची व तिच्या पित्याची समाजात बदनामी केली व मोठी फसवणूकही केली. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वधूपित्याची आहे.

 

टॅग्स :marriageलग्नdowryहुंडा