शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

नवोदय विद्यालयाची अष्मिका जिल्ह्यात ‘टॉप’

By admin | Updated: June 4, 2017 01:10 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे.

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर : सीजीपीए ग्रेडमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांची भरारीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी अष्मिका सबाने जिल्ह्यातून ‘टॉपर’ ठरली आहे. तिला ९७.४० टक्के गुण मिळाले. विशेष म्हणजे, सीजीपीए ग्रेडमध्ये (सर्व विषयात ९० टक्क्यांपेक्षा अधिक) यंदा प्रत्येक शाळेतून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले. तर सीबीएसईच्या जिल्ह्यातील सर्व शाळा १०० टक्के निकालाच्या मानकरी ठरल्या आहेत.बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावीत घवघवीत यश मिळविले. अष्मिका सबाने हिने ९७.४० टक्के मिळवून प्रथम स्थान पटकावले. तिला सामाजिक विज्ञानमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले. अजिंक्य चारोडे याला ९६.४० टक्के मिळाले. तर ९५.६० टक्क्यांसह स्मृती नव्हाते हिने तिसरा क्रमांक राखला. नवोदयमधून दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्व ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण घेतले. यवतमाळ येथील केंद्रीय विद्यालयातून दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्व ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यवतमाळ येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सचा निकाल १०० टक्के लागला आहे. येथील १५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले आहे. तर ४० विद्यार्थ्यांनी ८० पेक्षा अधिक, ५३ विद्यार्थ्यांनी ७० पेक्षा अधिक गुण घेतले आहेत. तर २३ विद्यार्थी बी वन आणि ५ विद्यार्थी बी टू ग्रूपमध्ये उत्तीर्ण झाले. अनुष्का देशपांडे आणि खुशी लोहिया या दोन विद्यार्थिनींनी ९७.८ टक्के गुण घेत शाळेतून पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ ऋतुजा वानखेडे व श्रीकृष्ण धोबे या दोघांनी ९६.४ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. सानिका संगीत कांबळे ९६.२, रजल बोरा ९६, दक्ष कुऱ्हाडे ९५.८ टक्के घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यवतमाळ येथील सेंट अलॉयसियस शाळेचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतील सर्व ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८ विद्यार्थ्यांनी सीजीपीए गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. यात संवेद पवार याला ९६.४ टक्के मिळाले असून तो शाळेतून पहिला आला. अनुष पचकाटे ९५.४, एकांश नानवाणी ९३.६, शरयू खंडारे ९३.२, परीक्षित नागपुरे ९३, राज बडमेरा ९२.८, अब्बास धंधुकवाला ९२.८, अथर्व पंचभाई ९२ टक्के गुण घेऊन प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. तसेच यवतमाळातील महर्षी विद्या मंदिराचाही १०० टक्के निकाल. पांढरकवडा येथील गुरुकुल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. राधा सचिन नार्लावार या विद्यार्थिनीने ९५.१६ टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम, तर श्रृतिका ढोकणे ९४.८३ गुणांसह व्दितीय ठरली. २१ पैकी ९ विद्यार्थ्यांनी सीजीपीए प्राप्त केला. वणी येथील स्वर्णलिला इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शंभरही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातून श्रेया लांडे या विद्यार्थिनीने ९७.२ टक्के गुणांसह शाळेतून पहिला क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ विरजा कवडे (९६.८), निसर्ग पावडे (९६.८) हे विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. वणीतीलच मॅक्रून स्टुडंट अकॅडमी शाळेतून ८७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ते सर्वच उत्तीर्ण झाले असून २२ विद्यार्थ्यांनी सीजीपीए गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. तर इतर विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणी मिळविली. या शाळेची तन्वी खैरे ९७ टक्के गुणांसह शाळेत अव्वल ठरली. साक्षी निमसरकार (९५), निरज बन्सल (९५), मोनिका जेनेकर (९४), प्रांजली काळे (९४), नंदिनी भाजीपाले (९४) या विद्यार्थ्यांनीही यश मिळविले. वणीच्या सुंदरनगरातील डीएव्ही पब्लीक स्कूलचा निकालही १०० टक्के लागला. या शाळेतून ९३ टक्के गुणांसह होमेश निंबार्ते पहिला आला. पुसदमधील जेट किड्स स्कूलची यंदा दहावीची दुसरीच बॅच होती. या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. १० विद्यार्थ्यांनी सीजीपीए गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.बोर्डाच्या तांत्रिक चुकीचा ‘वायपीएस’ला फटकासीबीएसई बोर्डाने शनिवारी दहावीचा निकाल घोषित केला. परंतु, यात तांत्रिक अडचणीमुळे यवतमाळ पब्लिक स्कूलचा (वायपीएस) वृत्त लिहिस्तोवर जाहीर झालेला नव्हता. या शाळेतून १३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३१ विद्यार्थ्यांचा ‘बोर्ड बेस्ड’ निकाल अपलोड करण्यात आला नाही. तर ४ विद्यार्थ्यांचा ‘स्कूल बेस्ड’ निकाल अपलोड झाला असून ते सर्व उत्तीर्ण आहेत. ही तांत्रिक चूक सुधारून बोर्ड सोमवारी निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.