शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवरगाव धरणाचे पाणी निर्गुडेतून थेट वर्धा नदीत

By admin | Updated: December 25, 2015 03:28 IST

मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून निर्गुडा नदीत सोडलेले लाखो गॅलन पाणी वाहून थेट वर्धा नदीला स्वाहा होत आहे.

पाणीटंचाईची झळ : प्रशासनाचे उपाययोजनांकडे दुर्लक्षवणी : मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून निर्गुडा नदीत सोडलेले लाखो गॅलन पाणी वाहून थेट वर्धा नदीला स्वाहा होत आहे. याकडे प्रशासन तसेच गावकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नदी काठावरील गावांना वारंवार पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने निर्गुडा नदीने नोव्हेंबर महिन्यातच जीव सोडला. नदी काठावरील २१ गावे व वणी शहराची जीवनदायीनी असणारी ही नदी कोरडी पडल्याने हजारो नागरिकांना चिंता पडली. यावर्षी नवरगाव धरणात ८६ टक्के जलसाठा झाल्याने ही चिंता थोडी फार कमी झाली. तरीही नवरगाव धरणाचे पाणी पुढील सहा महिने पुरेल काय, याचा विचार होणे गरजेचे आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच धरणातून नदीत तीन वेळा पाणी सोडले गेले. मात्र सोडलेले पाणी अडवून धरण्यासाठी कुठेही बंधारा नाही. त्यामुळे लाखो गॅलन पाणी वर्धा नदीच्या पोटात शिरून वाया जात आहे. सोडलेल्या पाण्याचे पैसे पंचायत समिती किंवा नगरपरिषदेला भरावे लागणार आहे. त्यामुळे निधीचाही उपयोग होण्याची चिन्हे नाहीत. नदीत एकदा सोडलेले पाणी जास्तीत जास्त १५ दिवस प्रवाहित राहते. त्यानंतर पुन्हा नदीचा प्रवाह खंडित होऊन नदी कोरडी पडते. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर सोडलेले पाणी १५ दिवसही नदीत टिकत नाही. त्यामुळे प्रशासनाने धरणातील पाणी आरक्षित करून ठेवले, तरी जतनेची सहा महिने तहान भागविण्यासाठी पाणी अपुरे पडणार आहे. नवरगाव धरणाचे पाणी शेती सिंचनासाठी मिळणे दुरापास्तच झाले आहे. नदीत सोडलेले पाणी किमान वनराई बंधारे बांधून जागोजागी अडविण्याची नितांत गरज आहे. कवडशीवासीयांनी हे पाऊल उचलले. नदीकाठावरील इतर गावांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे काळाची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनानेही पुढकार घेणे आवश्यक आहे. डॉ.श्रीकर परदेशी हे यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना वनराई बंधाऱ्यांची संकल्पना भरभराटीस आली होती. जिल्ह्यात जनतेच्या श्रमदानाने हजारो वनराई बंधारे बांधून त्यावेळी जलसंवर्धन करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन वर्षात वनराई बंधारा ही संकल्पना लुप्त होत असल्याचे दिसून येते. परिणामी जनतेला यावर्षी भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र प्रशासन उपययोजनांकडे दुर्लक्ष करतानाच दिसत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)