शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या डरकाळीने नवकारनगर हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 22:29 IST

नवकारनगर परिसरात जितेंद्र पुनवटकर यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घराच्या ओळीतच आणखी काही घरे थोड्या अंतरावर आहेत. शनिवारी पहाटे ४ वाजताच्यासुमारास या भागात अचानक हलकल्लोळ माजला. पुनवटकर यांच्या घराच्या कपाउंडमध्ये जखमी असलेला राेही भयभीत अवस्थेत जिवाच्या आकांताने ओरडत होता. दुसरीकडे वाघाच्या डरकाळ्याही ऐकू येत होत्या, असे नागरिकांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : भुरकी-रांगणा शिवारात एका तरुणावर वाघाने हल्ला करून त्याला ठार मारल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील वातावरण प्रचंड भयग्रस्त झाले आहे. शनिवारी पहाटे वणी शहराला अगदी लागून असलेल्या नांदेपेरा मार्गावरील नवकारनगरात एक जखमी अवस्थेत रोही आढळून आला. त्यापाठोपाठ वाघाच्या डरकाळ्याही ऐकू आल्या. त्यामुळे या भागात वाघाचा वावर असल्याची शंका नागरिक व्यक्त करू लागले आहेत. नवकारनगर परिसरात जितेंद्र पुनवटकर यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घराच्या ओळीतच आणखी काही घरे थोड्या अंतरावर आहेत. शनिवारी पहाटे ४ वाजताच्यासुमारास या भागात अचानक हलकल्लोळ माजला. पुनवटकर यांच्या घराच्या कपाउंडमध्ये जखमी असलेला राेही भयभीत अवस्थेत जिवाच्या आकांताने ओरडत होता. दुसरीकडे वाघाच्या डरकाळ्याही ऐकू येत होत्या, असे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात वणी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर वांढरे, नायक पोलीस शिपाई सचिन मडकाम हे घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पुनवटकर यांच्या घराशेजारी एक रोही जखमी अवस्थेत दिसून आला. तो जोरजोराने ओरडत होता. सूर्योदय होताच नागरिक घराबाहेर निघाले. याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर राऊंड ऑफिसर राजूरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने या परिसरात वाघाच्या पायाचे ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते दिसून आले नाहीत. मात्र या भागात वाघ फिरत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. मागील आठवड्यातदेखील याच परिसरात वाघाच्या हालचाली दिसून आल्या होत्या. त्यामुळे या वसाहतीच्या जवळच असलेल्या स्वर्णलीला शाळेने विद्यार्थ्यांना एक दिवसाची सुटी दिली होती. एकूणच वाघाच्या अस्तित्वाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

वाघाच्या बंदोबस्तासाठी दोन दिवसांत आढावा बैठकवाघाचा वाढता वावर लक्षात घेता, नागरिकांच्या तक्रारीवरून वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शनिवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून वाघाचा बंदोबस्त करण्यासंदर्भात तातडीने हालचाली करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत, ना. मुनगंटीवार यांनी येत्या दोन दिवसांत आढावा बैठक घेण्याचे आदेश वन विभागाला दिले आहे. यासाठी अधिकारी वणीत येणार आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघ