येरे माझ्या मागल्या : तीन फूट पाण्यातून काढावा लागतो मार्गसोनखास : ‘नेमेचि येतो पावसाळा’ यानुसार सोनखास येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी आणि वन विभागाच्या कार्यालयाला तलावाचे स्वरूप आले आहे. प्रत्येक वर्षी जुजबी उपाययोजना करून दिवस ढकलले जात आहे. कायमस्वरूपी पर्याय काढला नसल्याने याहीवर्षी विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वर्गात जावे लागत आहे. गेली दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथे सर्वत्र पाण्याचे डबके साचले आहे. शाळा परिसरासह वन विभागाचे कार्यालय, निवासस्थान आणि झोपडपट्टी भागाला पाण्याने वेढले आहे. शाळेच्या आवारात तीन ते चार फूट पाणी आहे. पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्या बुजल्या आहे. घर परिसरात पाणी साचून असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे. काही भागात वृक्षांची पडझड झाली आहे. (वार्ताहर)
सोनखासच्या शाळेला तलावाचे स्वरूप
By admin | Updated: August 6, 2015 00:14 IST