शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वाटप केवळ नऊ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 21:15 IST

जिल्ह्यातील सर्व बँकांना यावर्षी दोन हजार १६१ कोटी रूपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पेरणीपूर्वी हे १०० टक्के कर्ज वाटप करायचे असताना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज वितरणात मागे पडल्या. या बँकांनी अत्यंत संथगतीने वाटप सुरू केल्याने अनेक पात्र शेतकरी अद्याप कर्जापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देउद्दिष्ट २१०० कोटींचे : वाटप ४१३ कोटी, पेरणीच्या तोंडावर शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सर्व बँकांना यावर्षी दोन हजार १६१ कोटी रूपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पेरणीपूर्वी हे १०० टक्के कर्ज वाटप करायचे असताना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज वितरणात मागे पडल्या. या बँकांनी अत्यंत संथगतीने वाटप सुरू केल्याने अनेक पात्र शेतकरी अद्याप कर्जापासून वंचित आहेत.दोन हजार १६२ कोटींचे उद्दिष्ट असताना आत्तापर्यंत केवळ २३ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. त्यातही राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ ९ टक्के कर्ज वितरित केले आहे. यामुळे राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज वितरणात हात आखडता घेत असल्याचे उघड झाले. विशेष म्हजे याच बँकाकडे सर्वाधिक कर्ज वाटपाची जबाबदारी आहे. मात्र या बँका कुंणाचेही ऐकायला तयार नाही. यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीस आले आहे.राष्ट्रीयकृत बँकांनी आत्तापर्यंत केवळ ९.५८ टक्के कर्जाचे वितरण केले. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक शाखा असणाऱ्या स्टेट बँकेने कर्ज वितरणात आखडता हात घेतला सर्वाधिक शाखा असूनही या र्बंकेचे कर्ज वितरण अत्यंत कमी आहे. ही स्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांना पेरणी करणे अवघड होणार आहे. पाऊस आता तोंडावर आला आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीत असताना कर्ज मिळत नसल्याने त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले आहे. यातून कृषी अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता वाढली आहे.आत्तापर्यंत सर्वाधिक कर्जाचे वितरण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. या बँकेला ५४४ कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. प्रत्यक्षात बँकेने आत्तापर्यंत ३२७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेने जवळपास ६० टक्के कर्ज वितरण केले आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने उद्दीष्टाच्या केवळ १० टक्केच कर्जाचे वाटप केले. विशेष म्हणजे ज्या राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांच्या नावावर जाहिराती करतात, त्या बँकांनी केवळ ८६ कोटी रूपयांचेच कर्ज वितरित केले. या बँका शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांना वालीच उरला नाहीपेरणी तोंडावर असून मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अशा स्थितीत ७७ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाचा छदामही जमा झाला नाही. गतवर्षीपासून कर्जाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची सहनशीलता आता संपली आहे. मात्र शेतकऱ्यांना आधार देणारा पाठीराखाच उरला नाही. सत्ताधारी लोकसभेच्या विजयात मश्गुल आहे, तर विरोधक चिंतन बैठकीत व्यस्त आहे. कुणीच शेतकºयांबद्दल अवाक्षरही बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांसाठी झटणाºया संघटनाही दूरूनच तमाशा बघत आहे.मुख्यमंत्र्यांचा आदेश पायदळी तुडविलाराष्ट्रीयकृत बँकांनी गतवर्षी पेरणीपूर्वी ६ टक्केच कर्ज वितरण केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी बँकांच्या तिजोरीवर टाच आणताच कर्ज वितरण वाढले होते. यावर्षी मुख्यमंत्र्यांनी बँकांना तातडीने कर्ज वाटपाचे आदेश दिले. मात्र त्यांच्या आदेशाला बँकांनी तूर्तास केराची टोपली दाखविल्याजे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीयीकृत बँका ऐकत नसतील, तर वाटेल त्या मार्गाने त्यांना सरळ करण्याचा इशारा दिला होता. तरीही या बँका कर्ज वितरणाबाबत उदासीन आहे.

टॅग्स :bankबँक