शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा

By admin | Updated: November 18, 2015 02:48 IST

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सोमवारी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यवतमाळ : जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सोमवारी राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश गोरख, ज्येष्ठ पत्रकार प्रा. न. मा. जोशी, दिनेश गंधे, पद्माकर मलकापुरे, अनिरूद्ध पांडे, लक्ष्मण खत्री, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, आरती गंधे, संदीप खडेकर, जलालुद्दीन गिलाणी, श्रीकांत राऊत, धनंजय खारोकर, रघुवीरसिंह चव्हाण, निलेश भगत, शाकीर अहमद, सय्यद मतीन शेख, छायाचित्रकार वासुदेव भुटाणी यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण एका व्यंगचित्रासाठी दिवसभर फिरायचे. प्रचंड अभ्यास व्यंगांसाठी ते करत. त्यानंतर व्यगंचित्र तयार होत असे. एका लेखाइतकेच व्यंगचित्राचे महत्त्व आहे. अनेक बाबी केवळ व्यंगचित्रातून व्यक्त होत असल्याने अशा चित्रांना फार महत्त्व आहे, असे जोशी म्हणाले. पत्रकारिता धर्म आहे. परंतु अलिकडे तो धंदा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपणास लाभलेला पत्रकारितेचा वारसा आपण टिकविला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी अध्यक्ष नागेश गोरख, ज्येष्ठ पत्रकार दिनेश गंधे, पद्माकर मलकापुरे, अनिरूद्ध पांडे यांचीही भाषणे झाली. मलकापुरे यांनी चांगला दृष्टिकोन ठेवून पत्रकारिता करावी, असे सांगितले. गोरख यांनी पत्रकार सुरक्षा कायदा व पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. गंधे यांनी शेतकरी आत्महत्येसारख्या सामाजिक प्रश्नाला पत्रकारांनी वाचा फोडल्याचे सांगून पत्रकारांची बाजू समजून घेणारे एखादे मंडळ असावे, असे सांगितले. पांडे यांनी अनेक व्यंगचित्रांचा दाखला देत त्याचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमामागची भूमिका जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी प्रास्ताविकातून विशद केली. आभार श्रीकांत राऊत यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)