मारेगाव : तालुक्यातील २0 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल गुरूवारी घोषित झाले. त्यात मनसेने प्रथमच काही ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्राप्त केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवनाळा ग्रामपंचायतीत सातपैकी जार जागी विजय प्राप्त केला. त्यात राहुल आत्राम, लिलाबाई टेकाम, प्रभाकर आत्राम आणि सूर्यभान वाघाडे यांचा समावेश आहे. केगाव ग्रामपंचायतीत सातपैकी गजानन आत्राम, कल्पना आत्राम, मंगला पिंपळशेंडे, अवि हरबडे आणि आशा पांडुरंग हे पाच उमेदवार विजयी झाले. नरसागाळा ग्रामपंचायतीत मनसेने एकहाती वर्चस्व प्राप्त केले. तेथे मनसेचे नऊपैकी सुधाकर ऊईके, गुंफा ऊईके, रूंदा ढाले, लक्ष्मण कनाके, प्रतिभा चिकराम, कल्पना देवाळकर आणि सुधाकर ऊईके असे सात उमेदवार विजयी झाले. महागाव सिंधी येथे पवन मिलमिले, विमल आत्राम, बोरी खुर्द येथे देविदास आत्राम, शशिकला आडे, कल्पना गावंडे, तर बोरी गदाजी येथे विजय गेडाम आणि निर्मला शेबंळे विजयी झाले. जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर, उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्या नेतृत्वात मनसेने प्रथमच तीन ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्राप्त केले. चोपण येथे संतोष थेरे गटाचे प्रफुल्ल गोपाळ थेरे, संदीप लहू खिरटकर हे दोन सदस्य अविरोध, तर नंदा सुधाकर थेरे आणि लिला कमलाकर येरमे हे दोन सदस्य विजयी झाले. कान्हाळगाव येथील प्रभाग क्रमांक एकच्या पोटनिवडणुकीत कुंदन देविदास गेडाम यांनी केवळ एका मताने विजय प्राप्त केला. प्रभाग क्रमांक दोनमधून चंद्रभान विठ्ठल मडावी हे केवळ आठ मतांनी विजयी झाले. (शहर प्रतिनिधी)
नरसाळा येथे झाले सत्तांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2015 01:18 IST