शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचे ‘फाईव्ह एफ’ उगवलेच नाही ; दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 10:28 IST

राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी यांनी फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन असा ‘फाईव्ह एफ’चा विकास मंत्र दिला होता. परंतु भाजपा सरकारची तीन वर्षे लोटूनही हे ‘फाईव्ह एफ’ उगवलेले नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे पंतप्रधान पदाचे ...

ठळक मुद्देना उद्योग, ना प्रकल्प, लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा

राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी यांनी फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन असा ‘फाईव्ह एफ’चा विकास मंत्र दिला होता. परंतु भाजपा सरकारची तीन वर्षे लोटूनही हे ‘फाईव्ह एफ’ उगवलेले नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी देशात तीन ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतले होते. गुजरातमधील कार्यक्रमात चांगले प्रशासन तर दिल्लीतील कार्यक्रमात महिला सुरक्षा व स्वावलंबनाचे आश्वासन दिले होते. ‘चाय पे चर्चा’चा तिसरा कार्यक्रम चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघातील दाभडी (ता. आर्णी जि. यवतमाळ) गावात २० मार्च २०१४ रोजी आयोजित केला होता. सॅटेलाईटमार्फत देशभरातील १५०० प्रमुख शहरांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करून मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांशी आणि विशेषत: कापूस उत्पादकांशी ‘लाईव्ह’ संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ‘फाईव्ह एफ’ हा आपला शेतकऱ्यांच्या विकासाचा मंत्र असल्याचे सांगितले होते. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकत असल्याने हा कापूस थेट विदेशात पाठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन ही पंचसूत्री सांगितली होती. या माध्यमातून शेतकºयांना शेती खर्चाच्या ५० टक्के नफा, पीक विमा हप्ता भरण्यासाठी कर्ज, मोठ्या प्रमाणात सूत गिरण्या, कापड गिरण्या उभारणी, कमी व्याजात जास्त कर्ज, शैक्षणिक कर्जाची शासकीय हमी आदी घोषणा केल्या होत्या. खुद्द भावी पंतप्रधानच आपल्या गावात येऊन घोषणा करीत असल्याने कर्ज व नापिकीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

दाभडीची अवस्थाही ’जैसे थे’ज्या दाभडी गावातून मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांच्या विकासाची घोषणा केली, त्या दाभडी गावातही भाजपाला विकासाचा सूर्य उगविता आलेला नाही. मोदींची घोषणा किती खरी किती खोटी हे दाभडीच्या अवस्थेवरून सिद्ध होते. जेथून घोषणा झाली ते दाभडी गाव भाजपा आमदाराच्या विधानसभा मतदारसंघातील आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या लोकसभा मतदारसंघातील आहे, हे विशेष.

तीन वर्षे लोटूनही कशाचाच थांगपत्ता नाहीकेंद्रात भाजपा सरकारला तीन वर्षे होत असतानाही अद्याप कुठेच कापसावरील प्रक्रिया उद्योग, कारखाने, कापड गिरण्या, सूत गिरण्या यापैकी कशाचाच थांगपत्ता नाही. कापूस उगवला पण नरेंद्र मोदींचे हे ‘फाईव्ह एफ’ उगवले नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांमधून ऐकू येत आहे. कमी दरात खते-बियाणे, पूर्ण वेळ वीज, शेतमालाला भाव, उद्योगांच्या माध्यमातून युवकांना रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार फेल ठरले आणि शेतकऱ्यांचीही घोर निराशा झाली.दाभडीतील ‘चाय पे चर्चा’वर ७० कोटी खर्च झाले. मात्र मोदींच्या घोषणेतील ‘पाच एफ’ अजून दिसलेच नाही. मोदींची ही घोषणा ‘चुनावी जुमला’ ठरली. त्यांच्या घोषणा आणि ‘मन की बात’ केवळ पब्लिसिटी स्टंट ठरल्या. निराधार योजनेत काँग्रेसने ६० चे ६०० केले मात्र भाजपाला त्यावर एक रुपयाही वाढविता आलेला नाही. नोटाबंदी व जीएसटीचा निर्णय घाईने व अभ्यासाशिवाय घेतला गेल्याने तो पूर्णत: सामान्य जनतेवर उलटला.- अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी मंत्री

टॅग्स :Governmentसरकार