उमरखेड : येथील उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकारी यांना उमरखेड तालुका वीरशैव समाजाकडून नांदेड येथील समाजबांधवांवर झालेल्या अन्यायाविरोधात गुरूवारी निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ््यासाठी नांदेड येथील नवीन कौढा भागातील नियोजित जागा मिळण्यात यावी, या मागणीसाठी २२ फेब्रुवारी रोजी कृती समितीच्यावतीने नांदेड वाघाळा महापालिकेवर मोर्चा धडकला. मोर्चेकऱ्यांनी आयुक्तांनी समोर यावे व निवेदन स्वीकारावे, असा आग्रह धरला होता. शांततेत मोर्चा चालू असताना पोलिसांनी निरपराध वीरशैव बांधवांवर अमानुष लाठीहल्ला केला. त्यामध्ये सात जण गंभीर व शेकडो वीरशैव बांधव जखमी झाले. झालेल्या प्रकरणाची चौकशी करून निष्क्रिय मनपा आयुक्त व अमानुषपणे लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच पुतळ््यासाठी जागा देण्यात यावी, असे निवेदनातून नमूद केले आहे. यावेळी शंकरआप्पा हिंगमिरे, रामराव गांजरे, विकास मुलंगे, सचिन साखरे, डॉ. जयशंकर जवणे, गजानन रासकर, प्रभाकर दिघेवार, गणेश हदगांवकर, अशोक चिंचोलकर, गजानन दुधेवार, डॉ. श्विचरण हिंगमिरे, मारोतराव ठमके, नंदकुमार बुटले, सुभाष तुपेकर, श्याम हदगावकर, नितीन सोनाळे, नीलेश बोन्सले आदींसह अनेकजण उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
नांदेड लाठीहल्ल्याचा उमरखेडमध्ये निषेध
By admin | Updated: February 26, 2016 02:21 IST