शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पंचांच्या नावावर हडपला निधी

By admin | Updated: September 24, 2016 02:38 IST

येथील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे प्रताप माहिती अधिकारातून बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली असून

परजिल्ह्यातील दाखविले पंच : बोगस नावे आणि स्वाक्षऱ्याही नीलेश भगत यवतमाळ येथील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे प्रताप माहिती अधिकारातून बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली असून आता बनावट पंचगिरी करून लाखो रुपयांचा निधी हडपल्याचे पुढे येत आहे. कागदोपत्री स्पर्धेत पंच म्हणून शिपाई आणि कर्मचाऱ्यांची नावे दिसून येत आहे. २०१५-१६ च्या शालेय क्रीडा घेण्यात आली. सुब्रतो फुटबॉल आणि शालेय फुटबॉल स्पर्धेत सात पंच दाखविण्यात आले. त्यांना १२ हजार २०० रुपये मानधन वाटप केल्याचे देयक सादर केले. मात्र या सातही पंचांनी आॅगस्ट महिन्यात प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी प्रदीप शेटिये यांच्याकडे मानधन मिळाले नसल्याची तक्रार केली आहे. गतवर्षी जिम्नॅस्टिक या खेळात केवळ एकाच संघाची नोंद झाली होती. परंतु ही स्पर्धा दोन दिवस खेळविल्याचे दाखवून पाच पंचांचे मानधन पाच हजार रुपये काढण्यात आले. स्क्वॅश हा खेळ तर कागदोपत्रीच दाखवून पाच पंचाच्या नावावर तीन हजार रुपये हडपण्यात आल्याचे दिसून येते. सायकलिंग या खेळात केवळ तीन खेळाडू सहभागी झाले होते. केवळ ३० मिनिटात ही स्पर्धा आटोपली. मात्र आठ पंचांची फौज दाखवून त्यांच्या नावे ४८०० रुपयांचे बिल काढण्यात आले. हॅन्डबॉल व व्हॉलिबॉल या खेळाच्या आयोजनासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांचा निधी आहे. मात्र या दोनही खेळात पंच मानधनावर दहा हजार ८०० रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. बास्केटबॉल या खेळात पंचाची अनेक नावे बोगस असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातील एका वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाचे नावही यासाठी वापरले आहे. बॅडमिंटन या खेळात तर एका विद्यमान आमदाराच्या पुत्राला पंच दाखवून त्याच्या नावावरही पैसे हडपल्याचे दिसून येते. अशा अनेक खेळात जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाने पैसा हडपल्याचे प्रकरण उघडकीस आले.