शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ मुक्तीसाठी नमाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:09 IST

रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली.

ठळक मुद्देरमजान ईद : देशात शांती, सुरक्षा, एकतेसाठी प्रार्थना, पोलिसांकडून गुलाबपुष्प भेट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रमजान ईदच्या पर्वावर बुधवरी येथील ईदगाह मैदानावर दुष्काळ मुक्तीसह पावसासाठी नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलानांनी देशात शांतता, सुरक्षा आणि एकता कायम राहावी म्हणून प्रार्थना केली.दुष्काळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण स्थिती निर्माण झाली. सततच्या दुष्काळाने राज्यात पाच हजार टँकरच्या मदतीने पाणी वितरण केले जात आहे. अनेक गावांची तहान केवळ टँकरवरच अवलंबुन आहे. राज्यात भीषण स्थिती आहे. अशात पावसाळा लांबण्याचे संकेत हवामान खात्याने दिले. स्थिती अधिक बिकट होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईदच्या पर्वावर संपूर्ण देशभरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून विशेष नमाज अदा केली. यावेळी दुष्काळावर मात करण्यासाठी मुबलक पावसासाठी अल्लाहला साकडे घालण्यात आले.येथील जामा मस्जीदचे इमाम मुफ्ती महंमद जाफीर कासमी यांच्या नेतृवात मुस्लीम समाज बांधवांनी नमाज अदा केली. देशात शांतीची प्रार्थना केली. रमजान ईदनिमित्त कळंब चौकात पोलीस बांधवांनी मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प भेट दिले. यातून एकतेचा संदेश दिला. यवतमाळसह संपूर्ण जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरासह जिल्ह्यात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली.बाभूळगाव येथे ईद साजरीबाभूळगाव : पवित्र रमजान महिन्यानंतर येणारी रमजान ईद येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शांतता समितीचे सदस्य आणि पोलीस विभागातर्फे मुस्लीम बांधवांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ईदगाहमध्ये नमाज पठन करून येणाऱ्या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ठाणेदार सतीश जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब गौरकार, प्रकाशचंद छाजेड, सहायक पोलीस निरीक्षक विनोद देशमुख, प्रवीण तातेड, बल्लू जगताप, प्रकाश रत्ने, एच.पी. ठाकरे आदींनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.जकातने दिला अनेकांना मदतीचा हातमुस्लीम समाज बांधव समाजाप्रती देणे म्हणून उत्पन्नातील काही वाटा गोळा करतात. त्याला जकता म्हणून संबोधले जाते. ही जकात सामाजातील वंचित बांधवांना मदत म्हणून दिली जाते. जमा झालेली मदत ईद साजरी होण्यापूर्वी अनेक कुटुंबांना दिली गेली. एका समाज बांधवांने जकात देताना समाजातील गरीब परिवाराला मदत म्हणून बैलजोडी घेऊन दिली. या त्या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळाला. दान देणाऱ्यांनी ‘गुप्तदान श्रेष्ठदान’ म्हणत आपले नाव गुप्त ठेवले.