शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये रस्त्याची कामे रात्री करण्याचे ‘फॅड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 22:09 IST

कुठलीही कामे अंधार पडण्यापूर्वी उरकण्याची घाई केली जाते. मात्र नेर तालुक्यात अंधार पडल्यानंतर कामाला सुरुवात होते. अलीकडे सुरू झालेले हे फॅड कामांच्या दर्जाविषयी साधार शंका निर्माण करणारे आहे. अशा कामांना अधिकाऱ्यांची मूकसंमती असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देदर्जाविषयी साशंकता : सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची मूकसंमती

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कुठलीही कामे अंधार पडण्यापूर्वी उरकण्याची घाई केली जाते. मात्र नेर तालुक्यात अंधार पडल्यानंतर कामाला सुरुवात होते. अलीकडे सुरू झालेले हे फॅड कामांच्या दर्जाविषयी साधार शंका निर्माण करणारे आहे. अशा कामांना अधिकाऱ्यांची मूकसंमती असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री सडक योजना, ग्रामीण सडक योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून रस्त्याची कामे होत आहे. रात्री १ ते २ वाजतापर्यंत अंधुक प्रकाशात कामे करण्यात येत आहे. या भागातील रस्ते खूप वर्दळीचे नसतानाही कामे रात्रीच का केली जात असावी, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रामुख्याने बाभूळगाव रस्ता तयार करताना रात्रीचीच वेळ निवडली जात आहे. सदर रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. डांबराचे कमी प्रमाण, निकृष्ट गिट्टी, साहित्याचा थर कमी असल्याचे सांगितले जाते. रात्री काम झाल्यास हा सर्व प्रकार झाकला जातो, त्यामुळेच अशा पद्धतीने कामे होत असल्याचे सांगितले जाते. ही कामे करताना मजुरांचा जीवही धोक्यात येण्याची भीती आहे. थोड्याशा उजेडात काम करताना त्यांना येणाऱ्या अडचणींकडे कंत्राटदारांचे दुर्लक्ष सुरू आहे. मात्र गैरप्रकार लपविण्यासाठी आटापिटा होत असल्याचे सांगितले जाते.कामाच्या तपासणीची गरजबाभूळगाव रस्त्याचे आतापर्यंत झालेले काम गुणनियंत्रण विभागाकडून तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सदर रस्त्याचे काम इस्टिमेटनुसार होत असल्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शिवाय अधिकाऱ्यांकडूनही या कामांची तपासणी होत नाही.

नेर तालुक्यात कुठलाही कंत्राटदार रात्री काम करत नाही. संध्याकाळी ७ वाजता कामे थांबविली जातात. यावेळेपर्यंतची कामे रात्री होतात असे म्हणता येणार नाही.- भूपेश कथलकर, उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, नेर.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग