शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांपासून बचाव करताना तलावात बुडून मायलेकाचा मृत्यू

By admin | Updated: August 24, 2016 00:50 IST

मधमाशांपासून बचावासाठी तलावात उडी घेतलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कळंब तालुक्यातील नांझा येथे मंगळवारी दुपारी २ वाजता घडली.

नांझाची घटना : एक जण अत्यवस्थ, रुग्णालयात उपचार सुरू कळंब : मधमाशांपासून बचावासाठी तलावात उडी घेतलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कळंब तालुक्यातील नांझा येथे मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. कांताबाई किसन मसराम (५५), श्याम किसन मसराम (३५) अशी मृतांची नावे आहेत. रामभाऊ देवबा मसराम (५०) हे जखमी झाले. सदर तिघे शेतात खत देत होते. त्याचवेळी मधमाशांचा घोळका शेतात शिरला. तिघांवरही त्यांनी हल्ला चढविला. यातून सुटका करण्यासाठी रामभाऊ हा दूरवर जावून थांबला. मात्र कांताबाई आणि श्याम या दोघांनी शेतालगतच असलेल्या तलावात उडी घेतली. मात्र दोघेही गाळात फसल्याने मृत्यू पावले. जखमी रामभाऊला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कांताबाई किसन मसराम (५५), त्यांचा मुलगा श्याम किसन मसराम (३५) व नातेवाईक रामभाऊ देवबा मसराम (५०) यांचे नांझा शिवारात तीन एकर शेत आहे. हे तिघेही मंगळवारी सकाळी ६ वाजता पिकांना खत देण्यासाठी घरून निघाले. खत देत असताना सकाळी ९ वाजताच्या सुमारास दुसरीकडून उडत आलेल्या मधमाशांनी तिघांवरही अचानकपणे जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने तिघे घाबरले. या हल्ल्यातून वाचण्यासाठी कांताबाई व श्याम मसराम यांनी जवळच असलेल्या छोट्याशा तलावातील पाण्यात उडी घेतली. तलावातील पाण्यात बुडाल्यानंतरही मधमाशांनी हल्ला सुरूच ठेवला. त्यामुळे मायलेकाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. रामभाऊ मसराम यांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. परंतु मधमाशांच्या हल्यात तेही जखमी झाले. याप्रकरणीची कळंब पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मशमाशांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकामुळे शोककळा पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)