यवतमाळ : मुस्लीम समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांना घेऊन आॅल इंडिया तनजीम-ए-इन्साफ संघटनेतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेण्यात आला. मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती व तनजीम-ए-इन्साफ संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाबा शहजाद यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हा कार्यकारी अध्यक्ष नवाब खाँ पठाण आदींचा या मोर्चात प्रामुख्याने समावेश होता. श्रावणबाळ व संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा, रहिवासी पुरावा ज्या ठिकाणचा आहे त्याच तहसीलमधून जातीचे प्रमाणपत्र मिळावे, शिष्यवृत्ती योजना आदी मुद्द्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. या मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अलिम बाबू सौदागर, सैय्यद इमरान पटेल, फैय्याज काझी शेख मुसा, इमरान खान, राजा राशिद, हारून शेख, शाहिस्ता खान, नईम खान, उमेश गदई, अमजद खान, ओंकार करंदिकर आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
मुस्लीम आरक्षणासाठी अधिवेशनावर धडक
By admin | Updated: December 21, 2015 02:43 IST