सोनखास : भाल्याने भोसकून चुलत भावाचा निर्घृण खून करणाऱ्या लासीना येथील आरोपीला लाडखेड पोलिसांनी अकोलाबाजार येथे मंगळवारी सकाळी मोठ्या शिताफिने जेरबंद केले आहे. लासीना येथील अरुण सखाराम कुडमथे (३५) याचा सोमवारी भाल्याने भोसकून चुलत भाऊ असलेल्या उत्तम तुकाराम कुडमथेने निर्घृण खून केला होता. घटनेनंतर तो पसार झाला होता. लाडखेड पोलिसांनी उत्तमला मंगळवारी सकाळी अकोलाबाजार येथून अटक केली. जागेचा वाद आणि सहा महिन्यापूर्वी तोडफोड प्रकरणात अरुणच्या भावाने दिलेली साक्ष यामुळे आपण त्याचा खून केल्याची कबुली उत्तमने पोलिसांपुढे दिली आहे. ही कारवाई ठाणेदार नरेश रणधीर, जमादार तिवारी यांनी केली. (वार्ताहर)
चुलत भावाचा खून करणारा जेरबंद
By admin | Updated: August 26, 2015 02:37 IST