शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात एकतर्फी प्रेमातून युवतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 19:15 IST

Yawatmal news एकतर्फी प्रेमप्रकरणातून गावातीलच युवकाने युवतीच्या घरी जावून गुप्तीने भोसकून निर्घृण खून केल्याची खळबळनजक घटना पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत रामपूरनगर येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका युवतीचा चाकू व गुप्तीने भोसकून खून केला. तालुक्यातील रामपूरनगर येथे शनिवारी (१५ मे) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही धक्‍कादायक घटना घडली.  यातील आरोपीला सायंकाळच्या सुमारास खंडाळा पोलिसांनी धनसळ परिसरातील जंगलातून अटक केली. 

सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे मृत युवतीचे नाव आहे. आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपी युवकाचे नाव आहे. खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामपूरनगरात ही घटना घडली. मृत युवती सुवर्णा आणि आरोपी आकाश हे दोघेही एकाच  गावात राहात होते. त्यांच्यात ओळख झाली. आकाश हा सुवर्णावर  एकतर्फी प्रेम करीत होता. सुवर्णाने दहावीपर्यंतचे शिक्षण गावात घेतले. त्यानंतर तिने पुसद येथे बारावीचे शिक्षण घेऊन नंतर  डीएड पदविका प्राप्त केली. त्यानंतर ती गावी आई-वडिलांसोबत राहत होती. 

शनिवारी सकाळी सुवर्णाचे आई व वडील पांढुर्णा (केदारलिंग) येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते तर  तिचा भाऊ श्याम काही कामानिमित्त देवठाणा येथे गेला होता. यावेळी घरी सुवर्णा व तिची वृद्ध आजी होती. सुवर्णा भांडे घासत असताना आरोपी आकाश तिच्या घरी पोहोचला. त्याने सुवर्णाच्या आजीला एका खोलीत कोंडून ठेवले. नंतर भांडे घासत असणाऱ्या सुवर्णावर चाकू व गुप्तीने सपासप वार केले. काही क्षणातच सुवर्णा रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर आकाशने घटनास्थळावरून पळ काढला.  या घटनेची माहिती गावकऱ्यांनी खंडाळा पोलिसांना व तिच्या पालकांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी अवस्थेत सुवर्णाला पुसद येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र काही वेळातच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

पाच पथके होती मागावरआरोपी फरार झाल्याने खंडाळा पोलिसांनी त्याचा शोधासाठी पाच पथक तयार केले होते. अखेर शनिवारी सायंकाळी आकाशला धनसळ परिसरातील जंगलातून अटक करण्यात आली. 

दोनही कुटुंब सर्वसाधारणच मृतक सुवर्णा व आरोपी आकाश या दोघांचेही कुटुंब सर्वसाधारणच आहे. रोजमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही महिन्यांपासून आकाश सुवर्णावर एकतर्फी प्रेम करीत होता. याची तिला खबरबातही नव्हती. अखेर शनिवारी आकाशने तिचे घर गाठून निर्घृण खून केला. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी