लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विकृती ही कोणत्या प्रकारची असू शकते याचा उलगडा रुपेश महेंद्र देशभ्रतार याच्या खुनातील आरोपींच्या कबुलीतून झाला आहे. अल्पवयीन व समवयस्कांना धमकावून थेट अनैसर्गिक लैंगिक चाळे होत असल्याने ही मुले अक्षरश: दहशतीत होती. रोजमजुरीचा पैसाही रुपेश हिसकावत होता. याच जाचातून त्याचा गेम करायचा हा कट मित्राच्या मुलाच्या बर्थ-डे पार्टी रचल्याचे मारेकऱ्यांनी पोलिसांना सांगितले.जांब रोडवरील वन उद्यान परिसरात रुपेश देशभ्रतार याचा मृतदेह आढळला. काही तासातच पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकासह सहा आरोपींना अटक केली. शनिवारी या आरोपींकडून घटनेचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. त्यावेळी त्यांनी रुपेशचा कसा जाच होता हे ओक्साबोक्शी रडत पोलिसांना सांगितले. मालानीनगरमध्ये बर्थ-डे पार्टीत खुनाचा कट रचला. रुपेशनेच सहाही जणांना एका अवैध दारू गुत्त्यावर दारू पाजली. नंतर बायपासवर ट्रक लुटायचा म्हणून तो शस्त्रासह सहाही जणांना वन उद्यानातील पायवाटेने घेऊन गेला. हीच संधी आहे, असे म्हणत सहाही जणांनी बेसावध रुपेशवर सपासप घाव घातले. चाकू व कोयत्याने त्याचे शरीर छिन्नविछीन्न केले. शेवटी डोक्यात दगड घालून पळ काढला. रक्ताने माखलेले कपडे जाळून नष्ट केले.शाळकरी मुलांनाही होता त्रासझोपडपट्टीतील मुले अर्ध्यावर शिक्षण सुटल्याने रोजमजुरी करीत होते. मात्र ते पैसे रुपेश हिसकावून घेत होता. एका-दोघांंना तर त्याने थेट चाकूने वार करून जखमी केले. नंतर प्रकरण पोलीस ठाण्यात जाऊच नये यासाठी तडजोडही केली. यामुळे रुपेशची दहशत होती. मालानीनगरमधील जिल्हा परिषद शाळेत रुपेशच्या धाकाने मुले जात नव्हती. तो ज्या दिवशी दिसला त्या दिवशी शाळा पडली इतकी त्याची दहशत होती असे सांगितले जाते.
बर्थ-डे पार्टीतच खुनाचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST
अल्पवयीन व समवयस्कांना धमकावून थेट अनैसर्गिक लैंगिक चाळे होत असल्याने ही मुले अक्षरश: दहशतीत होती. रोजमजुरीचा पैसाही रुपेश हिसकावत होता. याच जाचातून त्याचा गेम करायचा हा कट मित्राच्या मुलाच्या बर्थ-डे पार्टी रचल्याचे मारेकऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
बर्थ-डे पार्टीतच खुनाचा कट
ठळक मुद्देसंडे अँकर । रुपेशच्या अनैसर्गिक कृत्याची अल्पवयीनांमध्ये दहशत