शोभायात्रा : वाघापूर येथे चार दिवस प्रवचनयवतमाळ : जैन संत क्रांतिवीर मुनिश्री प्रतिकसागरजी महाराज यांचा १३ मे रोजी यवतमाळात प्रथमच प्रवेश होत आहे. सकाळी ७ वाजता येथील दर्डा मातोश्री सभागृहाजवळून शोभायात्रा काढली जाणार आहे. समारोप वाघापूर येथील भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे धर्मसभेने होणार आहे. मुनिश्रींचे १३ ते १६ मे या कालावधीत सकाळी ८ ते ९.३० या वेळात प्रवचन, तर सायंकाळी ४ ते ५ या वेळात शंकासमाधान कार्यक्रम होणार आहे. मुनिश्री प्रतिकसागरजी महाराज लातूर, नांदेड, आर्णी मार्गे विहार करीत आहेत. आचार्य पुष्पदंतसागर महाराज यांचे प्रभातिशिष्य, प्रवचनकार असून क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागरजी महाराज यांचे गुरूबंधू आहेत. त्यांच्या प्रवचनाचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा, अशी विनंती सकल जैन समाजातर्फे करण्यात आली आहे. (वार्ताहर)
मुनिश्री प्रतिकसागरजी महाराज उद्या यवतमाळात
By admin | Updated: May 12, 2016 02:43 IST