शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेने अत्यावश्यक कामे करावी

By admin | Updated: August 10, 2014 23:13 IST

नगरपरिषद क्षेत्राच्या विकासासाठी शासन नगरोत्थान, दलीत वस्ती सुधार अशा विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देते. या विधीचा विनियोग करताना अत्यावश्यक सुविधांना

यवतमाळ : नगरपरिषद क्षेत्राच्या विकासासाठी शासन नगरोत्थान, दलीत वस्ती सुधार अशा विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देते. या विधीचा विनियोग करताना अत्यावश्यक सुविधांना नगरपरिषदांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या कामकाजाचा आढावा व त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सर्व नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्र्यांसह अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, आ. वामनराव कासावार, आ. संजय राठोड, आ. ख्वाजा बेग, जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक सिडाम, यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय, पांढरकवडाचे नगराध्यक्ष शंकर बडे, घाटंजीच्या चंद्ररेखा रामटेके, आर्णीचे आरीज बेग यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनेतून नगरपरिषदांना कामे मंजूर होतात. मंजूर कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देण्यासोबतच निधी वितरीत करण्याच्या सूचना मोघे यांनी बैठकीत केल्या. नगरपरिषदांकडून विकास कामांसाठी मोठ्याप्रमाणात निधीची मागणी असते. त्यातुलनेत कमी निधी असल्याने समान तत्वावर निधी वाटपाचे धोरण स्विकारण्यात येते आहे. शासनास जादा निधी मागविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. तसेच विकास कामांसाठी नगरपरिषदेला जास्तीत जास्त निधी कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोघे म्हणाले. यावेळी उपस्थित नगराध्यक्षांनी नगरपरिषदांमध्ये असलेल्या रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित केला. सदर पदे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भरल्या जात असल्याने पदे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी विनंती नगराध्यक्षांनी केली. त्यावर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी पांढरकवडाचे नगराध्यक्ष शंकर बडे यांनी नगरपरिषदांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. (स्थानिक प्रतिनिधी)