शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूस नदीपात्रात पालिकेची सफाई मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:00 IST

आॅनलाईन लोकमतपुसद : अपुऱ्या पावसामुळे यंदा पुसदकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुसद नगरपरिषदेने विविध उपक्रम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणजे जलशुद्धीकरण केंद्राजवळील पूस नदीवरील बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढविणे होय. त्यासाठी सफाई मोहीम हाती घेण्यात आली असून गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.शहराला ...

ठळक मुद्देपाणीटंचाई : गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ, बंधाºयाच्या साठवण क्षमता वाढीवर भर

आॅनलाईन लोकमतपुसद : अपुऱ्या पावसामुळे यंदा पुसदकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुसद नगरपरिषदेने विविध उपक्रम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणजे जलशुद्धीकरण केंद्राजवळील पूस नदीवरील बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढविणे होय. त्यासाठी सफाई मोहीम हाती घेण्यात आली असून गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस झाला. त्यामुळे या धरणात केवळ १५-२० टक्केच पाणीसाठा आहे. जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता नगरपरिषदेने दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. परंतु त्यानंतरही धरणातील पाणी आटले तर काय? म्हणून पूस नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पूस धरणातून पुसदकरांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाणी सोडल्यानंतर पूस नदीतून ते जलशुद्धीकरण केंद्राच्या बंधाऱ्यात अडविले जाते. हा बंधारा पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा कसा होईल, या दृष्टीने नगराध्यक्ष अनिता नाईक, पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांच्या पुढाकारात पूस नदी स्वच्छता मोहीम व बंधाऱ्यातील गाळ काढून खोलीकरण, रुंदीकरण आदी कामांना प्रारंभ केला आहे. तीन जेसीबी मशीन व मजुरांच्या माध्यमातून या बंधाºयाची साठवण क्षमता वाढविणार आहे. पूस धरणातून महिन्यात एकदा नदीत पाणी सोडावे लागेल. एक महिना साठवण केलेले पाणी पुसदकरांना पुरवठा करता येईल. वारंवार धरणातून पाणी सोडल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत होता. आता त्याला आळा बसणार व पाण्याची बचत होवून उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.