शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुगाला कवडीमोल भाव

By admin | Updated: September 22, 2016 01:45 IST

गतवर्षी दुष्काळाने मुगाचे भाव गगनाला भिडले होते. यावर्षी मात्र रिमझिम पावसावर मुगाचे विक्रमी उत्पादन झाले.

उत्पादन विक्रमी : दर मात्र हमीभावापेक्षाही कमीअखिलेश अग्रवाल  पुसदगतवर्षी दुष्काळाने मुगाचे भाव गगनाला भिडले होते. यावर्षी मात्र रिमझिम पावसावर मुगाचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र आता बाजारात मात्र मूगाची कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. हमी भावापेक्षाही कमी दराने मुगाची विक्री होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.मुगाचा हमी भाव पाच हजार २२५ रुपये प्रतिक्विंटल असून खुल्या बाजारात मात्र व्यापारी चार हजार ते पाच हजार या दराने मूग विकत घेत आहे. गत वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे मुगाचे उत्पादन घटले होते. त्यामुळे मुगाचे भावही सात हजार ते आठ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढले होते. त्यातच डाळीचे भावही १०० रुपये किलो झाले होते. तर तूरडाळ गतवर्षी २०० रुपये किलो झाल्यामुळे मुगाच्या डाळीचे भावही गगनाला भिडले होते. यावर्षी पाऊसही चांगला झाला व डाळीला भाव चांगले मिळत असल्यामुळे डाळवर्गीय पिकांच्या पेऱ्यातही वाढ झाली आहे. आता नवा मूग बाजारात येत असून मागील वर्षीपेक्षा निम्या किमतीत मूग विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सध्या बाजारात नव्या मूगाला खुल्या बाजारात व्यापारी चार हजार ते साडेचार हजार या भावाने खरेदी करीत आहे. सर्रासपणे हमीभावापेक्षा कमी भाव मूगाला मिळतो आहे. त्यामुळे केंद्राने जाहीर केलेले मूगाचे हमीभाव शेतकऱ्यांसाठी केवळ आशेचे गाजर ठरले आहे. या सर्व प्रकाराने मूग उत्पादक शेतकरी मात्र चांगलेच हवालदिल झाले आहे.