शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुडाणा-गौळ रस्ता देतो अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

मुडाणा ते गौळ रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. याच मार्गावर मुडाणा, गौळ, बोथा, लोहरा, मोरथ, धारमोहा, धारेगाव, उटी, सनेंद, हिंगणी, नेहरुनगर, टेंबुरधरा आदी गावांतील ग्रामस्थांना जा-ये करावी लागते. या गावांमधील विद्यार्थी याच मार्गाने शाळेत जातात. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, पुसद, महागाव, उमरखेडला जाणे-येणे झाले कठीण

नरेंद्र नप्ते ।लोकमत न्यूज नेटवर्कमुडाणा : महागाव तालुक्यातील मुडाणा ते गौळ दरम्यानचा मार्ग अपघाताला निमंत्रण देत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातची शक्यता बळावली आहे.मुडाणा ते गौळ रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. याच मार्गावर मुडाणा, गौळ, बोथा, लोहरा, मोरथ, धारमोहा, धारेगाव, उटी, सनेंद, हिंगणी, नेहरुनगर, टेंबुरधरा आदी गावांतील ग्रामस्थांना जा-ये करावी लागते. या गावांमधील विद्यार्थी याच मार्गाने शाळेत जातात. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सेनंद हे या मार्गावरील महागाव तालुक्यातील शेवटचे गाव आहे. हाच मार्ग महागाव ते उमरखेड रस्त्याला मुडाणा येथून जोडला गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सतत अपघाताची भीती असते. कधी काय होईल, याचा नेम नसतो. पावसाळ्यात या रस्त्यावर दीड फूट खोल जीवघेणे खड्डे पडले. रस्त्याच्या दुतर्फा झुडपे वाढली आहे. त्यामुळे चालकाला समोरून येणारे वाहन दिसत नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे.रुग्णांचा जीव संकटातया मार्गावरील कोणत्याही गावातील रुग्णला पुसद येथे नेताना अडचण निर्माण होते. रस्त्याअभावी रात्री-अपरात्री दवाखान्यात जाण्याची वेळ आल्यास रुग्णाचा जीव जाण्याची भीती असते. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता ‘जैसे थे’ आहे.निधी नसल्याने काम थांबले आहे. निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी प्राप्त होताच कामाला सुरुवात होईल.- संतोष नाईकउपविभागीय अभियंता, महागाव 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा