शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खासदार, आमदारांचा ‘वट’ यंत्रबंद

By admin | Updated: February 23, 2017 01:01 IST

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता मिनी मंत्रालय कोण सर करणार, यावरून जिल्ह्यातील तीन

निकालाची उत्सुकता : मिनी मंत्रालय कोण सर करणार, विजयाचे दावे-प्रतिदावे सुरूच रवींद्र चांदेकर   यवतमाळ पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता मिनी मंत्रालय कोण सर करणार, यावरून जिल्ह्यातील तीन खासदार अन् १३ आमदारांचा ‘वट’ नागरिकांना कळणार अहे. सर्व पक्ष, त्यांचे नेते, मंत्री, खासदार, आमदारांनी निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावून प्रचार केला. आपापल्या प्रभावक्षेत्रातील आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. काही गटांमध्ये राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचार सभा झाला. त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. आता या सर्व नेते, लोकप्रतिनिधींचा मतदारांवर किती प्रभाव पडला, हे जनतेला कळून चुकणार आहे. मतदान पार पडताच सर्वच पक्ष विजयाचे दावे करीत सुटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना हे चारही मुख्य पक्ष विजयाचा दावा ठोकत आहे. बहुमत आमचेच, असा घोषा त्यांनी लावला आहे. मात्र मतदार राजाने नेमका कुणाच्या बाजूने कौल दिला, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. ते उद्याच कळणार अ‍ोहे. मतमोजणी पूर्णत्वास जातपर्यंत प्रत्येक पक्ष व नेते विजयाचे दावे करतील. मात्र उद्या सर्वांचीच पोलखोल होणार आहे. मतदारांनी नेमका काय कौल दिला, हे स्पष्ट होईल. तोपर्यंत सर्वच पक्ष, उमेदवार आणि नेते विजयाचे स्वप्न रंगवीत राहतील. ग्रामीण मतदारांनी आपला हक्क बजावताना सर्व पक्ष व नेत्यांच्या आश्वासनांचा लेखाजोखा नजरेसमोर ठेवून कर्तव्य पार पाडले. त्यांना विजयाचा अदमासही आहे. मात्र मतदार राजा चुप्पी साधून आहे. लोकप्रतिनिधींची कसोटी ४मतमोजणीअंती जिल्ह्याला लाभलेल्या तीन खासदार अन् १३ आमदारांचा वकूब जिल्ह्यातील जनतेला कळणार आहे. जिल्ह्याला तीन खासदार लाभले. विधानसभेचे सात व विधानपरिषदेचे तब्बल सहा आमदार लाभले. यात अहीर केंद्रात राज्यमंत्री आहे. तीन आमदार मदन येरावार, संजय राठोड व डॉ. रणजित पाटील राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री आहे. माणिकराव ठाकरे विधान परिषदेचे उपसभापती आहेत. उर्वरित नऊ आमदारांमध्ये मनोहरराव नाईक, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र नजरधने, राजू तोडसाम, श्रीकांत देशपांडे, ख्याजा बेग, तानाजी सावंत आदींचा समावेश आहे. या लोकप्रतिनिधींचा जिल्ह्यात किती ‘वट’ आहे, हे मतमोजणी अंती दिसून येणार आहे.