शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कार्पोरेट शाळा विधेयक परत घेण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 22:18 IST

कार्पोरेट कंपन्यांना शाळा सुरु करण्याची परवानगी देणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय सध्याच्या शिक्षणप्रणालीला उद्ध्वस्त करणारा आहे.

ठळक मुद्देशिक्षकांचा पवित्रा : शिक्षणाधिकाºयांमार्फत शिक्षणमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कार्पोरेट कंपन्यांना शाळा सुरु करण्याची परवानगी देणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय सध्याच्या शिक्षणप्रणालीला उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे हे विधेयक परत घेण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षक महासंघाच्या वतीने शनिवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले.कंपन्यांच्या शाळांकरिता २०१२ च्या महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा अधिनियमात बदल करण्यात आला. याबाबतचे विधेयक २० डिसेंबरला विधानसभेत संमतही करण्यात आले आहे. परंतु, आता हे विधेयक विधानपरिषदेत न मांडता परत घेण्यात यावे, अशी मागणी आंदोलक शिक्षकांनी केली. केवळ नफा कमाविणे एवढाच कंपन्यांचा हेतू असून त्या जादा फी आकारतील. त्यामुळे बहुजन समाजातील मुलांना शिक्षण घेणे दुरापास्त होईल, अशी भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे. मराठी शाळा बंद पडून राज्यातील शिक्षणाचा बट्ट्याबोळ होईल. शिक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांची चढाओढ वाढून त्या मनमानी कारभार करतील. त्यामुळे आधीच हतबल असलेल्या शासनापुढे कंपन्यांना नियंत्रित करण्याचे आव्हान निर्माण होईल. त्यामुळे २० डिसेंबरला विधानसभेत संमत झालेले विधेयक आता विधानपरिषदेत संमत न करता मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष नीलेश तायडे, जिल्हा सचिव एन. आर. राठोड, वाय. एम. वानखडे, पी. ई. कडूकार, ए. आर. केवटे, एम. टी. घोटेकार, एस. व्ही. निंबाळकर, देवेंद्र आत्राम, अनिल महाजन, संजय गजबे, संजय पाटील, विजय निकम, पी. एच. मिरासे, ए. के. काळे, उमेश निमकर, ज्ञानेश्वर डाबरे, व्ही. एफ. राठोड, डी. आर. गावंडे, एस. एच.कडू, एस. एल. बेंडे, डी. के. महाजन, विजय पाटील वानखडे, वाय. एन. चतूरकर आदी उपस्थित होते.