शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अस्थायी डॉक्टरांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 16:16 IST

Doctor Yawatmal news सेवेत नियमित करावे, या मागणीसाठी राज्यातील साडेसहाशे डॉक्टरांनी गुरूवारी अधिष्ठात्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.

ठळक मुद्देसेवेत नियमित करा सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १२० दिवसांची ऑर्डर घेऊन कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. सेवेत नियमित करावे, या मागणीसाठी राज्यातील साडेसहाशे डॉक्टरांनी गुरूवारी अधिष्ठात्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.

वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून ४५० डॉक्टर कार्यरत आहेत. या डॉक्टरांना शासन सोयीप्रमाणे वापरते. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे (एमसीआय) तपासणी पथक आल्यानंतर कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना दाखवूनच एमबीबीएस जागांना मान्यात घेतली जाते. आता राज्यात नव्याने वैद्यकीय महाविद्यालय होत आहे. अधिव्याख्यात्यांची राज्यात ५७३ पदे रिक्त आहेत. त्यानंतरही शासन अस्थायी सहायक प्राध्यापकांवर अन्याय करीत आहे. एमबीबीएस व एमडीची पदवी घेण्यासाठी ३२ वर्षे लागतात. ही पवी घेऊनही त्यांची अवहेलना केली जात आहे.

कोरोना महामारीच्या संकटात हेच सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी सेवा बजावत आहेत. त्यांना शासनाने सेवेत नियमित करावे, केवळ १२0 दिवसांची ऑर्डर देऊन केली जाणारी बोळवण थांबवावी, ही प्रमुख मागणी आहे. या मागणीला अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.राज्यातील सर्वच मेडिकलमध्ये कार्यरत अस्थायी डॉक्टरांनी गुरुवार व शुक्रवारी लाक्षणिक आंदोलन करून निदर्शने केली. शासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर १ नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा अस्थायी डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे.अस्थायी सहायक प्राध्यापकांना सेवेत नियमित करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. आदेश असूनही अद्याप सातवा वेतन आयोग लागू केला नाही. एमबीबीएस, एमडी डॉक्टरांचे शासन हाल करीत आहे. या आंदोलनाला वैद्यकीय शिक्षण संघटनेचा पूर्ण पाठींबा आहे.- डॉ. समीर गोलावार,राज्य सचिववैद्यकीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र

टॅग्स :doctorडॉक्टर