लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भ राज्य संघर्ष समिती, फॉरवर्ड ब्लॉक, अन्याय निवारण समिती यांच्यातर्फे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी येथील नेताजी चौकात आंदोलन करण्यात आले. माजी आमदार विजयाताई धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भवादी या आंदोलनात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणा दिल्या.यावेळी माजी आमदार विजयाताई धोटे, श्रीराम खिरेकर आदींनी स्वतंत्र विदर्भाविषयी मार्गदर्शन केले. नगरसेवक नितीन मिर्झापुरे, गोपाल पाटील, रमेश अगरवाल, वीणा नागदिवे, उषा काळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. मुकुंद दंदे, गणेश कोसरकर, प्रभाकर काळे, बाबा पाटणे, ज्योती ओंकार, गोलू कटारिया, प्रशांत गंगमवार, प्रकाश गुल्हाने, मो. इरशाद, अनुप तेलानी, वहीद अकबानी, दिनेश पाचकवडे, सुनंदा डोंगरे, गिरिश खंदेडिया, मोतीराम सिंह, पप्पू चौकडे, सचिन काळे, शेख जाकीर, वर्षा पारिशे, दुर्गा आत्राम, सीता आत्राम, सुनीता नैताम, वनिता काळे, सविता पारिशे, पार्वती कोडापे, सावित्री परचाके, उज्ज्वला कांबळे, रमा धवने, पप्पू छत्तानी आदी उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:06 IST